धुळे : मुंबई – आग्रा हायवेवर सोनगीर पोलिसांनी तब्बल 90 तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ते एका कारमधून या तलवारी धुळ्याच्या दिशेने घेऊन निघाले होते. या तलवारी आरोपी चित्तोडगड येथून जालना येथे घेऊन जात होते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी नेण्याचा उद्देश समोर आला नाही. याआधीही अशाच प्रकारे औरंगाबादला जाणाऱ्या तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या.
Dhule: 90 swords seized again; All four accused were remanded in custody शिरपूरकडून जालन्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला सोनगीर पोलिसांनी थांबवले. त्यांची झडती घेतली. तेव्हा हा तलवारीचा साठा सापडला. या प्रकरणी चालकासह तिघाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्या तलवारी नेमक्या कोणाकडे जात होत्या, याच्या मागे कोण, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखता तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणी चारही आरोपीना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी माहिती दिली.मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम आणि कपिल दाभाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे चारही जण जालना शहरातील चंदनजीरा भागातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे धुळ्यातील राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले आहेत. धुळे पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी जालना पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी चारही आरोपींवर चंदनजीरा पोलीस ठाण्यात भांडण, मारामारी आणि हत्याराने जाणीवपूर्वक इजा केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529862045358196/
भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी म्हणाले की, सोनगीर पोलिसांनी पकडलेला तलवारी नेमक्या पुढे जात होत्या त्याची सखोल चौकशी करून पोलिसांनी सत्य बाहेर आणावे. तसेच राज्यातील वातावरण पाहता पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी महोदयांनी माझ्या घरासह सर्वांच्याच घराची चाचपणी करावी. जेणेकरून सत्य समोर येईल. धुळे पोलिसांसह महाराष्ट्रातील पोलिसांनी दक्ष राहून या गोष्टीचे गांभीर्य ओळखावे, असे देखील हिरामण गवळी यांनी म्हटले आहे. हे फक्त हिमनगाचे टोक सापडले असून यातील काही तलवारी लंपास देखील झाल्याचा आरोप हिरामण गवळी यांनी केला आहे.
धुळ्याचे शिवसेना महानगरप्रमुख मनोज मोरे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. त्यामुळेच विरोधकांना हे सहन होत नसून, सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. तलवारी प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून यामागील खऱ्या सूत्रधारांना समोर आणून अटक करण्याची मागणीदेखील मोरे यांनी केली आहे.
काही दिवसांपासून राज्यातील वातावरण दूषित करण्याचे काम विरोधक करत असून, त्यांचा हा इरादा सेना कधीही सफल होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले. महाबली हनुमानाचे आम्ही देखील भक्त आहोत. मात्र, हनुमान चालिसाच्या नावाने रस्त्यवर बाजार मांडणे बंद करा. हनुमान चालिसा आम्ही देखील म्हणतो. मात्र, रस्त्यावर उतरून हनुमान चालीसाच्या नावाने राजकारण विरोधक करत असल्याचे मोरे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये देखील क्रांती चौक पोलिसांनी कुरियर मार्फत आलेल्या 7 जणांच्या नावावरील 37 तलवारी जप्त केल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. औरंगाबाद दंगलीनंतर पोलिसांनी 2018 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त केली होता. जुलै 2021 रोजी औरंगाबाद पोलिसांनी 41 तलवारी आणि 2 गुप्ती देखील जप्त केल्या होत्या. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये या तलवारी पाठवण्यासाठी कुरियरचा वापर केला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529863882024679/