□ अक्कलकोटमध्ये संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी
विरवडे बु : इंधन दरवाढीसह महागाईविरोधात मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो या गावांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात महायज्ञ आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीमुळे सर्वच क्षेत्राला झळ बसली आहे. प्रत्येकजण या महागाईमुळे मेटाकुटीस आला आहे.
Central government’s protest ‘Mahayagya’ movement in Mohol talukya केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल गॅस जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला जाऊन चार महिने होत आले तरी पण त्यांचे उसाचे बिल मिळत नाही व केंद्र सरकार दररोजच महागाई वाढवत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.
ठाकरे सरकार लोडशेडिंग करून शेतकऱ्यांना त्रास देत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार डिझेल पेट्रोल गॅस व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून त्रास देत आहे. या सरकारला 33 कोटी देवांनी सुबुद्धी द्यावी यासाठी महायज्ञ करून देवाला प्रार्थना केली व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी अनिल आबाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वैभव जावळे, हसन शेख, माजी सरपंच सागर राजेपांढरे, विश्वजीत पाटील, आबा देवकर, राजू पवार, सुरज पाटील, विकास जाधव, धनंजय गुंड आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529658938711840/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● अक्कलकोटमध्ये संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी
अक्कलकोट : भुरीकवठे येथे आज संत गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंभार गल्ली येथे गोरोबाकाका कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर मान्यवरांचे सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आले.
तदनंतर सरपंच मलम्मा रयगोंडे, उपसरपंच श्रीमंत कुंटोजी, ग्रामसेवक रतनसिंग चव्हाण, महिला पोलिस पाटील शांता बंगरगी, ग्रामपंचायत सदस्या अमिना ब्यलंबे, सुनिता खुने,वैशाली घोडके, हणमंत पात्रे, शिवराज कुंभार, विजकुमार व्हदलूरे, बसवण्णा सोंनकटले, कलाप्पा रायगोंडे, चंद्रकांत सोलापूरे यांची उपस्थिती होती.
भीम ज्योत तरुण मंडळाचे पदाधिकारी परमेश्वर बनसोडे, ज्येष्ठ नागरीक परमेश्वर कुंभार, प्रगतशील शेतकरी सिद्धाराम कुंभार, विठ्ठल कुंभार,संदीप कुंभार, गंगाराम कुंभार गणेश,महेश, तुळशीराम, अजय, बालाजी, हणमंत, दिलीप, अमित कुंभार उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवानंद कांबळे यांनी तर आभार ओंकार कुंभार यांनी मानले.