अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४४ व्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. कोरोना लॉकडाऊनमुळे खंडीत झालेला स्वामींचा पुण्यतिथी उत्सव सोहळा आज ‘अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या अबाल वृद्धांच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमला.
Thousands of devotees bow down to Swami on the occasion of Swami Punyatithi; The sky shook with the announcement आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून सोय केली होती.
मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार पुजारींच्या हस्ते पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती संपन्न झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत पार पडला.
देवस्थानचे व राजघराण्याच्या वतीने महेश इंगळे व गणेश दिवाणजी यांच्या उपस्थितीत पारंपरिक लघुरुद्र पहाटे ४ ते ५ या वेळेत पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले. गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेला अखंड नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी ७ वाजता देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांचे हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली.
सकाळी ११ वाजता देवस्थानची नैवेद्य आरती दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेबांच्या हस्ते जयप्रभादेवी राजेभोसले, श्रीराम कदम, ययाती साटम व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529809048696829/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, प्रथमेश म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उद्योगपती प्रवीण देशमुख, मुंबईचे उद्योगपती स्वानंद खेर, जालनाचे प्रसिद्ध व्यापारी श्वेतांबर महाडिक, इंदौरचे व्यापारी जगपाल सिसोदिया आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला.
या प्रसंगी दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले.
तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याचा समाप्ती सोहळा उत्सवाच्या आदल्या दिवशी संपन्न झाला. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४२ भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली.
यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, अँड.प्रदीप झपके, विजय दास, गणेश दिवाणजी, शशिकांत लिम्बीतोटे, शिवशरण अचलेर, प्रशांत गुरव, गिरीश ग्रामोपाध्ये, श्रीनिवास इंगळे, प्रथमेश इंगळे, मंगेश फुटाणे, चंद्रकांत डांगे, नंदू जगदाळे, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, मनोहर देगावकर, स्वामीनाथ लोणारी यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.