□ कोणाची सभा होणार हीट
मुंबई : मनसे, शिवसेनेने आपल्या सभांची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपनेही सभेची घोषणा केली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोनाच्या नंतर केवळ भाजपने इतका मोठा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसह महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. After the strike of MNS, Shiv Sena, now BJP’s meeting
राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांची अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली. काल मनसेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यानंतर आता या सभेच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांकडून अटी-शर्थींसह परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. सभेआधी पोलिसांकडून राज ठाकरेंना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सर्व सभा याच मैदानावर गाजल्या आहेत. म्हणून मनसेला ही राज ठाकरे यांची सभा याच मैदानावर हवी आहे. परवानगी तर फॉर्मलिटी आहे सभा तर नियोजित स्थळीच होणार असे ठाम आहे. सेनेचा गड असलेल्या औरंगाबादला राजकीय भगदाड पाडता येऊ शकेल. राज ठाकरे यांच्या मनसेला मराठवाड्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने एकच आमदार 2009 साली मिळाला आणि 2011 मध्ये जिल्हा परिषद 8 सदस्य त्यानंतर मनसे निरांक राहिली. मराठवाड्यात घुसून सेनेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे यांची रणनिती आहे.
भाजपने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलखोल अभियानातून भाजपा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. या पोलखोल मोहिमेची सभा १ मे रोजी मुंबईत होणार आहे, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
या सभेत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीची पोलखोल करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे या सभेकडे लक्ष लागले आहे. मविआचे भ्रष्टाचार बाहेर पडणार या भीतीने त्यांनी तोडफोड करण्यास सुरवात केली आहे. मात्र आम्ही संघर्ष करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529718318705902/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पुढे ते म्हणाले, पोलखोल अभियान अंतर्गत अनेक सभा आमच्या होत आहेत. याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ होत असून, आमच्या पोलखोल अभियानावर हल्ले करत आहेत. पोलखोल अभियानाचा रथ आणि स्टेज शिवसेना कार्यकत्यांनी तोडले. शिवसेना सध्या गुंडगिरी करत असल्याचे शेलार म्हणाले.
याच दिवशी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभा घेण्याची घोषणा केली आहे. राज्यात विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या आणि टीकाटिप्पणींचा समाचार घेत त्यास उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेणार आहेत. या सभेच्या आधी शनिवारी ३० एप्रिलला राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. भोंग्यांचा मुद्दा, हनुमान चालीसा मुद्दा यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे सुद्धा याच दिवशी पुण्यात सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच त्यांनी, “लवकरात लवकर मला मोठी सभा घ्यायची आहे. तिकडे परत एकदा मास्क काढून बोलायचं आहे. त्या सभेत सगळ्यांचा एकदाचा काय तो परामर्श आणि सोक्ष मोक्ष लावून टाकायचाय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याही यासभेत कोण-कोण निशाण्यावर असणार? याकडे सुद्धा लोकांचे लक्ष आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529711628706571/