मुंबई : उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.
There is no Yogi in Maharashtra, they are just ‘Bhogis’ of power! राज ठाकरे यांनी बंधु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकारने प्रार्थनास्थळांवरील कर्णकर्कश भोंगे उतरविण्याबद्दल कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!’ अशा शब्दात राज यांनी राज्यातील सरकारला टोलाही लगावला आहे. युपीत गेल्या 4 दिवसात तब्बल 11 हजार भोंगे काढलेत. दरम्यान राज यांनी महाराष्ट्रात 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत, यूपीमध्ये 4,258 लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत आणि 28,186 भोंग्यांचे आवाज निर्धारित नियमांनुसार कमी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 4,258 लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 125 धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. ज्या धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत. त्याबाबत रिपोर्ट मागण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील विविध धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवले जात आहेत. लखनऊ झोनमध्ये विविध धार्मिक स्थळांवरून 912 लाऊडस्पीकर काढण्यात आले आणि 6400 लाऊडस्पीकरचा आवाज नियमानुसार कमी करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी भोंग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत उत्तर प्रदेश सरकारने राबवलेल्या निर्णयावर देखील राज ठाकरेंनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना सुरुवात झालेली असताना मनसेकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून गुरुवारी सकाळी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असं आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “धार्मित तेढ कुणाकडून निर्माण होते? राज ठाकरे म्हणतात की जो न्यायालयाचा आदेश आहे, त्याचं पालन सरकारने करायला हवं. न्यायालयाच्या आदेशाचं पालनं करायला पाहिजे म्हणणारे लोक धार्मिक तेढ कसे निर्माण करतात, हे सरकारने स्पष्ट करायला हवं”, असं संदीप देशपांडे म्हणाले.”जे लोक म्हणतायत की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणार नाही, डेसिबलचं पालन करणार नाही, त्या लोकांना सांगायला हवं की धार्मिक तेढ निर्माण करू नका. आम्ही नियमांचं पालन करतोय. जे पालन करणार नाही, त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस देण्याची गरज आहे”, असं देखील ते म्हणाले.
□ उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिलेली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल,” असेही पवार म्हणाले.