□ महामार्ग उत्तर तालुक्यातून वगळला
सोलापूर : सुरत – चेन्नई ग्रीन कॉरिडॉर हा नवा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील , बार्शी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यांतून जाणार आहे. यासाठी भूसंपादनाबाबतचे करावयाच्या राजपत्र आहे. यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना वगळे आले. राजपत्र Gazette प्रसिद्ध झाल्याने भूसंपादनासाठी मोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Gazette issued for land acquisition of Surat-Chennai highway passing through three talukas of Solapur सूरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर हा नवा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यांतून जाणार असून यासाठी करावयाच्या भूसंपादनासाठी राजपत्र मंगळवारी प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी मोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात केली जाणार आहे. तसेच येत्या सप्टेंबरपूर्वी म्हणजेच गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
सूरत – चेन्नई ग्रीन कॉरिडॉर या नव्या हामार्गासाठी ७ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर झाली होती. त्यात जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट चार तालुक्यातील ५९ गावांमधून हा महामार्ग जाणार असल्याचे त्यात स्पष्ट केले होते. मात्र, पण मंगळवारी प्रसिध्द झालेल्या राजपत्रात उत्तर सोलापूर तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात राष्ट्रीय महाम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त म्हणाले, पूर्वीच्या मार्गात बदल करण्यात आला असून नवा मार्ग उत्तर सोलापूर तालुक्यातील एकाही गावातून जाणार नाही. उत्तर तालुक्याच्य सीमेवरून तो जाणार असल्याचे सांगण्यात आ त्यामुळे आता सूरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर उत्त तालुक्यातून जाणार नसून बार्शी, दक्षिण सोल आणि अक्कलकोट या तीन तालुक्यांतून जाण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सूरत-चेन्नई या ग्रीन कॉरिडॉर महामार्गासाठी बार्शी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यांतील ३५ गावातील गट नंबर यापूर्वीच ऑनलाइन जाहीर केले होते. आता त्याचा राजपत्रात समावेश करण्यात आल्याने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529629668714767/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मोजणी वेगाने होण्यासाठी व त्यात सुलभता येण्यासाठी रोव्हर मशीनद्वारे या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी पाच रोव्हर मशीनचा वापर केला जाणार आहे. या मशीनही सोलापुरात दाखल झाल्या आहेत.
बार्शी तालुक्यातील सासुरे, अलीपूर, नागोबाची वाडी, काळेगाव, हिंगणी आर, रातंजन, लक्ष्याची वाडी, सर्जापूर, कासारवाडी, बाळेवाडी, दडशिंगे, कव्हे, वैराग, मानेगाव, पानगाव, दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री, मुस्ती, तांदूळवाडी, तीर्थ तर अक्कलकोट तालुक्यातील उमरगे, मिरजगी, मैंदर्गी, नागोरे, संगोगी (ब), मुगळी, दुधनी, नागणहळ्ळी, अक्कलकोट, हसापूर, कोन्हाळी, दहिटणेवाडी, चपळगाववाडी, चपळगाव, डोंबरजवळगे व बोरेगाव आदी गावातील भूसंपादनासाठी pi नंबर जाहीर करण्यात आले आहेत.
सूरत-चेन्नई या ग्रीन कॉरिडॉरमुळे सोलापूर शहर परिसरासह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील यापूर्वीच्या पुणे, हैदराबाद, विजयपूर, धुळे आणि आता नव्याने पूर्ण झालेल्या सांगली, कलबुरगी या शहरांशी सोलापूरची दळवळण वाढली आहे.
आता नव्याने सूरत-चेन्नई हा महामार्ग सोलापूरला लाभत असून, जिल्ह्याला या महामार्गाचे १५० किलोमीटर अंतर लाभले आहे. बार्शी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. जिल्ह्यातील अनेकांचे या महामार्गाकडे लक्ष लागले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अनेक उद्योजक, कंपन्या सोलापुरात येतील असा अंदाज बांधला जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529585995385801/