Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरात राडा तर कुठे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

Radha in Solapur, where arrest of MNS activists started

Surajya Digital by Surajya Digital
May 4, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापुरात राडा तर कुठे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भोंग्यांबाबतच्या अल्टिमेटमनंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. त्यामुळे मनसे आंदोलनाला पोलिसांकडून चाप लावला जात आहे. तर सोलापुरात मनसे कार्यकर्ते – पोलिसांत राडा पाहायला मिळाला. मनसेकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. येथील सोन्या मारुती मंदिरात हा प्रकार घडला. Radha in Solapur, where arrest of MNS activists started

सोलापुरात मनसेच्यावतीने दत्त चौकातील सोन्या मारूती गणपती मंदिरासमोरील मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. भोंगे लावून महाआरती लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांकडून मनसेने लावलेले भोंगे जप्त केले. त्यामुळे तोंडीच आरती म्हणावी लागली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन तारखेची रमजान ईदनंतर 4 तारखेपासून महाराष्ट्रातील कोणत्याही मशिदीवर भोंगे वाजू देणार नाही, असा इशारा दिला होता जर भोंगे वाजले तर त्या समोर त्याच्या दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवू असे त्यांनी सांगितले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांनी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्यालय आणि घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, अभिषेक रंपुरे, राहुल अक्कलवाडे, यांनी सोन्या मारुती व  गणपतीसमोर महाआरती करण्याचा निश्चय केला होता. त्या पद्धतीने भोंगे ऍम्प्लिफायर लावण्यात आले होते. मात्र पोलिसांनी भोंगे वाजल्यापासून त्यांना रोखले आणि सर्व साहित्य जप्त केलं. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालीसा म्हटली.

दरम्यान जिल्हाध्यक्ष महिंद्रकर आणि लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो, ते सांगेल ते धोरण, ते बांधतील ते तोरण, त्यामुळे आम्ही ही हनुमान चालीसा म्हटली आहे. परंतु पोलिसांनी सुड भावनेने आमचे भोंगे आणि अंपलिफायर जप्त केले आहेत. आमच्याकडे काय शस्त्रे आणि हत्यारे होती का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंग्यांविना करण्यात आली आहे. पंढरपूर, कल्याण, मनमाड, रत्नागिरी, कल्याण, कोल्हापूरसह राज्यातल्या अनेक भागात पहाटेची अजान भोंगे न लावता करण्यात आले. यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले असून इतर मशिदींनीही असाच निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

सोलापुरात  भोंगे जप्तसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

□  पंढरपुरात मनसैनिक नजरकैद, धरपकड 

पंढरपूर  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा एल्गार पुकारला. 3 मे रोजी मुस्लिम समाजाचा रमजान ईदचा सण साजरा झाल्यानंतर 4 मे पर्यंत भोंगे न निघाल्यास मनसे कार्यकर्ते ते भोंगे काढतील अथवा मशिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करतील, असा इशारा त्यांनी औरंगाबादच्या सभेत दिला होता.

या पार्श्वभूमीवर राज्यात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आल्या आहेत.  मनसे नेते दिलीप धोत्रे यांना देखील पंढरपूर शहर पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यांच्यासोबत अनेक मनसैनिकांना देखील ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना आज पंढरपुरात नजरकैद केले होते. पोलिस ठाण्यात आणून बसवले होते.

 

Tags: #Radha #Solapur #arrest #MNS #activists #started#सोलापूर #राडा #मनसे #कार्यकर्ते #धरपकड #भोंगे
Previous Post

मनसे इफेक्ट, पंढरपूरसह राज्यात अनेक ठिकाणी भोंग्यांविना नमाज

Next Post

‘माझी बायको अन् उद्धव ठाकरेंच्यात एक साम्य’

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
‘माझी बायको अन् उद्धव ठाकरेंच्यात एक साम्य’

'माझी बायको अन् उद्धव ठाकरेंच्यात एक साम्य'

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697