सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक जाहीर केल्यास नगरपरिषद प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज आहे. 17 पैकी पाच नगरपंचायतींच्या निवडणूका झाल्या आहेत. अनगर नगरपंचायत आणि अकलूज नगरपरिषद वगळता उर्वरित दहा नगरपरिषदांची अंतीम प्रभाग रचना तयार आहे. Administration ready for municipal elections; Preparation of final ward structure of ten Municipal Councils
निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास आमची तयारी असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाचे सहआयुक्त एन. के. पाटील यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपरिषद प्रशासन अलर्ट झाले आहे. पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी, करमाळा, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, सांगोला तसेच मोहोळ या नगरपरिषदांची मुदत संपली आहे.
या नगरपरिषदांच्या निवडणुका प्रस्तावित आहे. तसेच नव्याने स्थापन झालेले अकलूज नगरपरिषद तसेच अनगर नगरपंचायतीची प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम सुरू आहे.
माढा, माळशिरस, श्रीपूर म्हाळुंग, वैराग, नातेपुते या मुदत संपलेल्या पाच नगरपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत झाल्या. अनगर नगरपंचायतीची नव्याने स्थापना झाल्यामुळे प्रभाग रचना अंतीम करायचे काम अद्याप सुरू आहे. अ वर्ग नगर परिषदेसाठी निवडून आलेल्या नगर परिषदेच्या सदस्यसंख्येत दोनने वाढ झाली आहे. तसेच अ वर्ग नगर परिषदेमध्ये सदस्यसंख्या कमित कमी 40 तर 75 पेक्षा जादा नसणार आहे.
ब वर्ग नगर परिषदेसाठी निवडून आलेल्या परिषदेच्या सदस्यसंख्येत दोनची भर पडणार आहे. ब वर्ग नगर परिषदेसाठी किमान सदस्यसंख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल. क वर्ग नगर परिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यसंख्येमध्ये तीनने वाढ केली आहे. क वर्ग नगर परिषदेसाठी किमान सदस्यसंख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/534911714853229/
》सोलापुरातील 42 ग्रामपंचतीमधील 48 जागांसाठी 5 जूनला मतदान
□ अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक ग्राममपंचायतीचा समावेश
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 48 जागासाठी 5 जून रोजी मतदान होणार आहे. 13 एप्रिल पासून निवडणूकीची प्रक्रिया चालू होणार आहे. यात अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक 14 ग्राममपंचायतीचा पोटनिवडणूकीमध्ये समावेश आहे.
शुक्रवार, 13 एप्रिलपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. 13 मे पासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. अकरा तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. 48 जागासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
अक्कलकोट तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीमधील 14 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. करमाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांसाठी, माढामधील दोन ग्रामपंचायतच्या 2 जागांसाठी, बार्शी मधील 5 ग्रामपंचायतच्या 5 जागांसाठी, उत्तर सोलापूर तालुक्यातील एक ग्रामपंचायतच्या 1 जागेसाठी, मोहोळमधील 2 ग्रामपंचायतच्या 3 जागांसाठी, पंढरपूर मधील 2 ग्रामपंचायतच्या दोन जागांसाठी, माळशिरसच्या 5 ग्रामपंचायतच्या 7 जागांसाठी, सांगोल्यातील 1 ग्रामपंचायतच्या 1 जागेसाठी, मंढळवेढा मधील 3 ग्रामपंचायतच्या 3 जागांसाठी, दक्षिण सोलापूर मधील 5 ग्रामपंचायतच्या 8 जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
□ असा असणार कार्यक्रम
– 13 ते 20 मे : अर्ज विक्री व स्वीकृती
– 23 मे, दुपारी 3 पर्यंत : प्राप्त अर्जांची छाननी
– 25 मे : अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिवस
– 25 मे : दुपारी तीन पर्यंत : उमेदवारांची अंतीम यादी चिन्हासह प्रसिद्धी
– 5 जून : मतदान आणि मतमोजणी
https://www.facebook.com/109399567404448/posts/534550514889349/