नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली आहे. आजच्या दरात वाढ झाल्यानंतर आता घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे. वाढलेली किंमत आजपासून लागू होणार आहे. The household budget collapsed, now you have to pay a thousand rupees for a cylinder
आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.
इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता गॅस महागला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडर महाग झाला होता. याआधी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १०२ रुपयांनी वाढल्या होत्या. एप्रिल महिन्यात या किंमतीमध्ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती. एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्या असताना आता घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/535750808102653/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. १ मे रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून २३५५.५० रुपये झाली, जी पूर्वी २२५३ रुपये होती. तसेच, ५ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे.
□ जुलै २०२१ पासून तब्बल ५ वेळा वाढ
जुलै २०२१ पासून तब्बल ५ वेळा गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत २२५३ रुपये होती.
१ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही ६५५ रुपयांवर पोहोचली आहे.
bjp हटाओ देश बचाओ – रुपाली ठोंबरे
#BJPHataoDeshBachao #surajyadigital #rupalipatilthombare #सुराज्यडिजिटल #political #tweets
》 नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या रुपाली ठोंबरे चांगल्याच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा घरगुती गॅसची किमंत वाढल्याने त्यांनी भाजप सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. महागाईचा भोंगा वाढला तब्बल 50 रुपयांनी गॅसची किंमत वाढली आता पुन्हा चुलीकडे जावे लागणार बहुतेक.. त्यामुळे ‘भाजप हटाव देश बचाओ…’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.
—————————————–
■ मुंबईत LIC कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग
#mumbai #LIC #office #एलआयसी #ऑफिस #surajyadigital #आग #fire #सुराज्यडिजिटल #मुंबई #santacruz
– मुंबईतील सांताक्रूझमध्ये एलआयसी कार्यालयाच्या इमारतीतील दुस-या मजल्याला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली ते अद्यापही स्पष्ट झाले नाही. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.