Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Shower and Tower अभिनेता रितेश देशमुखांच्या तोंडून ‘शॉवर अँन्ड टॉवर’ वॉटर पार्कचे कौतुक

Actor Riteish Deshmukh praises 'Shower and Tower' water park

Surajya Digital by Surajya Digital
May 9, 2022
in Hot News, सोलापूर
0
Shower and Tower अभिनेता रितेश देशमुखांच्या तोंडून ‘शॉवर अँन्ड टॉवर’ वॉटर पार्कचे कौतुक
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ परिवारासह वेळ घालवण्यासाठी चाकोते यांचे शॉवर अँन्ड टॉवर उत्तम ठिकाण – रितेश देशमुख

सोलापूर : सोलापूरच्या पर्यटनात भरघालणारे चाकोते यांचे शॉवर  अँन्ड टॉवर वॉटर पार्क परिवारासह वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. असे प्रतिपादन बॉलिवुड अभिनेते रितेश देशमुख यांनी केले. सोन्नलगी  अँक्वापार्क कंपनीच्या शॉवर  अँन्ड   टॉवर वॉटर पार्कचे उदघाटन त्यांच्या हस्ते आज सोमवारी ( दि. 9) करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. Actor Riteish Deshmukh praises ‘Shower and Tower’ water park Chakote Solapur

सोलापूर सारख्या ठिकाणी वॉटर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून चाकोते परिवाराने सोलापूरच्या पर्यटनामध्ये भर घातली आहे. या ठिकाणच्या सोई सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. पुर्वीच्या काळात रोटी, कपडा,मकान हे जीवनावश्यक मानले जायचे परंतु आता रोटी,कपडा, मकान आणि मनोरंजन हे आवश्यक झालेले आहे. कोरोना नंतर प्रत्येकाला आपल्या मनोरंजनाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यातच चाकोते परिवाराने ही सुविधा सोलापूरमध्ये करून दिली आहे.

चाकोते परिवाराच्या घरात विश्व आहे आणि त्यांनी मनोरंजनाचे हे नवे विश्व निर्माण केले आहे. बँकांनी केवळ कर्ज देण्यापुरतं मर्यादीत असू नये तर कर्जदाराच्या अडचणीत आधार देण्यासाठीही पुढे आले पाहिजे आणि ते काम भारतीय स्टेट बँकेने केले आहे. शॉवर  अँन्ड   टॉवर हे मॉडेल वॉटर पार्क व्हावे. विश्वशंकर आणि विश्वराज या दोघा चाकोते बंधुनी वॉटर पार्कचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे. नव्या पिढीतील तरूणांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे, असेही रितेश देशमुख यांनी सांगितले.

प्रारंभी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सर्वांचे स्वागत करीत आपल्या भाषणातून त्यांनी माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. महापौर असताना सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कशी मदत केली. या दोघांचा सत्कार करताना ‘दो हंसो का जोडा’ हे बिरूद त्यांना कसे लावले. आणि ते पुढे लोकप्रिय झाले. विलासराव यांचेच रूप रितेश देशमुख यांच्यामध्ये दिसून येत आहे आणि त्यांनी विलासराव प्रमाणेच सोलापूरवर प्रेम करावे अशी अपेक्षा विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या हिमतीने विश्वराज चाकोते या छोट्या भावासोबत विचार करून सोलापूरसाठी नवीन काहीतरी करायचे असे ठरवून शॉवर  अँन्ड टॉवर हे वॉटर पार्क सुरू केले. अनेक अडचणी आल्या त्यावर मात करून यशस्वीपणे हा प्रकल्प पूर्ण केला आहे. बाबुरावआप्पा चाकोते  आणि विलासराव देशमुख यांचे संस्कार आमच्यावर चांगल्या प्रकारे झाले त्यामुळेच आज आम्ही यशस्वीपणे काम करत आहोत. पुढे भविष्यात आणखी नवनवीन उपक्रम सुरू करणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकातून विश्वशंकर चाकोते यांनी सांगितले. युवक बिरादरीचे काम करीत असताना रितेश देशमुख यांच्याशी संपर्क आला. त्यांचा परिवार आणि चाकोते परिवार यांचे अनेक वर्षापासून घरगुती संबध आहेत. असेही ते म्हणाले.

शॉवर  अँन्ड   टॉवर वॉटर पार्क हे लोकांच्या मनोरंजनासाठी चांगला खजिना चाकोते परिवाराने दिला आहे त्यातून आनंद मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या भाषणातून केले.

भारतीय स्टेट बँक केवळ घर, गाडी, व्यवसायासाठी कर्ज देत नाहीतर मनोरंजनासाठीही कर्ज पुरवठा करते. आणि चाकोते परिवाराच्या शॉवर  अँन्ड टॉवर वॉटर पार्कसाठी कर्ज देवून बँकेने जो विश्वास दाखवला होता तो सार्थ ठरल्याचे दिसून येत आहे असे भारतीय स्टेट बँकेचे पुणे विभागीय व्यवस्थापक महेश्वर प्रसाद यांनी सांगितले. चाकोते परिवाराने सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचा हा चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे बार्शी शिवसेनेचे प्रमुख आंधळकर यांनी म्हटले.

प्रारंभी फित कापून आकाशात फुगे सोडून शॉवर  अँन्ड टॉवर वॉटर पार्कचे उदघाटन अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते झाले. नंतर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, प्रिसिजनचे यतीन शहा, सुहासिनी शहा, वळसंग सूत मिलचे राजशेखर शिवदारे, माजी नगरसेवक अमोल बापु शिंदे, सुप्रिता चाकोते, सुदीप चाकोते, सकलेश चाकोते, पृथ्वीराज दिलीप माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले तर आभार विश्वराज चाकोते यांनी व्यक्त केले.

 

□ चाकोतेंच्या घरचा डबा…

पूर्वी लातूरहून मुंबईला जाण्यासाठी सोलापूरला यावे लागत होते. सोलापूर हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. साहेब आणि आम्ही कधीही सोलापूरला रेल्वेस्टेशनवर आल्यानंतर चाकोते यांच्या घरातून डबा यायचा तो खाल्यानंतर आम्ही पुढे मुंबईला जात होतो अशी आठवण रितेश देशमुख यांनी सांगितली.

उदघाटन कार्यक्रमादरम्यान शिवरंजनीच्या कलावंतानी आपली कला सादर केली त्यामुळे प्रभावित होवून रितेश देशमुख यांनी भाषणाची सुरूवात करण्यापूर्वी शिवरंजनी वाद्यवृंद कलावंताचे विशेष कौतुक केले.

 

 

Tags: #Actor #RiteishDeshmukh #praises #ShowerandTower #waterpark #Chakote #Solapur#अभिनेता #रितेशदेशमुख #तोंडून #शॉवरअँन्डटॉवर #वॉटरपार्क #कौतुक #सोलापूर #चाकोते
Previous Post

… या तारखेला दहावी-बारावीचा निकाल !

Next Post

Three children died सोलापूर : खेळता खेळता खेळ झाला, तीन चिमुकले मुले शेततळ्यात बुडाले

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Three children died सोलापूर : खेळता खेळता खेळ झाला, तीन चिमुकले मुले शेततळ्यात बुडाले

Three children died सोलापूर : खेळता खेळता खेळ झाला, तीन चिमुकले मुले शेततळ्यात बुडाले

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697