नागपूर : नागपूर आज भयंकर सिलिंडर स्फोटाने हादरले. एकूण 15 स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भयंकर आग लागली. यात 100 झोपड्यांचे नुकसान झाले. बेलतरोडी परिसरातील महाकाली नगरात ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. Nagpur fire shakes Nagpur, 15 cylinders explode, hundreds of huts damaged, media attacked Mahakali Nagar
आग नेमकी कश्यामुळे आणि कुठे लागली यासंदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही, मात्र आगीच्या घटनेने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
नागपूरमधील महाकाली नगरमध्ये आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. या आगीत काही झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे.
सुरुवातीला एका झोपडीत आग लागल्यानंतर शेजारच्या अनेक झोपड्या देखील जळत गेल्या, त्यामुळे अनेक घरातील समान जळून राख झाले आहे. आग बर्यापैकी आटोक्यात आली असून, अद्याप तरी यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
महाकाली नगरमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. स्फोटानंतर लागलेली आग वेगाने फैलावू लागली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी 6 ते 7 वेळेस स्फोटाचे आवाज ऐकू आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537282474616153/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाकाली नगर मध्ये लागलेल्या आगीचे वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या चमूवर काही स्थानिक तरुणांनी हल्ला केला. एबीपी माझाचे कॅमेरामॅन अतुल हिरडे यांना खाली पाडून त्यांच्या हातातला कॅमेरा खाली पाडण्यात आला. अतुल हिरडे यांना किरकोळ मार लागला असून ते सुरक्षित आहेत. तर कॅमेऱ्याचे नुकसान झाले आहे. एबीपी माझाशिवाय आणखी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर काहींनी हल्ला केला असल्याचे वृत्त आहे.
पाण्याचे टँकरही पोहचले आहेत. मात्र झोपडपट्टी मोठी आहे. त्याशिवाय अरुंद गल्ल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागत आहे. अनेक अडथळ्यांवर मात करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. त्याशिवाय, स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
खूप मोठ्या प्रमाणावर स्फोट झाल्यामुळे महाकाली नगर मधील अनेक कुटुंबांनी त्यांच्या घरातील महत्त्वाचे साहित्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरसह सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. सध्या स्थानिक नागरिक आपल्या घरगुती साहित्यासह महाकाली नगरजवळच्या मोकळ्या मैदानावर आश्रय घेऊन आहेत. घटनास्थळी पोलिसांचा ताफा कमी असल्याने स्थानिक तरुणांचा धुडगूस सुरू आहे.
दरम्यान, नागपुरात तापमानाचा पारा ४५ अंशावर आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआय चौकात चालत्या सिटी बसला आग लागली होती. यामधून प्रवास करत असलेल्या ३० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला होता. त्यापूर्वी देखील काही वाहनं जळून खाली झाली होती. या कडाक्याच्या उन्हात झोपडपट्टीत लागलेली आग विझविण्याचं आव्हान अग्नीशमन दलासमोर आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537263591284708/