● पोलीस असल्याचे सांगून कुर्डुवाडीत सोन्याची चेन पळवली
सोलापूर : बझार पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास आज रंगेहाथ पकडले. Police caught red-handed taking a bribe of Rs 500 in Solapur
नाना बेशा शिंदे (वय ३७, रा. अरविंद धाम पोलीस लाईन, सोलापूर) असे लाच घेतलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार याच्याविरूध्द सीआरपीसी १०७ प्रमाणे करण्यात आली होती . या कारवाईमध्ये तक्रारदार याना सदर बझार पोलीसात २ मे ते १० मे २०२२ या कालावधीमध्ये दैनंदिन हजेरी लावण्यात आली होती.
त्यानुसार सदर बझार पोलिस ठाणे येथे हजर राहून हजेरी लावली असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्याकरिता पोलीस नाईक नाना शिंदे याने तक्रारदारास ५०० रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारलेे असताना त्यास रंगेहाथ पकडले.
ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक, पोलीस नाईक पकाले, घुगे, लण्णके यांनी पार पाडली.
दरम्यान, पोलीस कर्मचारी बळीराम माशाळकर याला महिनाभरापूर्वी निलंबित केले होते. बेशिस्त वर्तन आणि वागणुकीत बदल होत नसल्याने पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी बडतर्फीची कारवाई केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/537887774555623/
● पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याची चेन पळवली
कुर्डुवाडी : ‘ओ काका इकडे या, थांबा आम्ही सी आय डी पोलिस आहे. कुर्डुवाडीत चोरी झालीय’ अशी बतावणी करुन दोघा तोतयांनी सेवा निवृत्त एसटी कर्मचारी व पत्नीला अडवून झडती घेण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन पळवली.
चोरट्याने ६३ हजारांची गळ्यातील २१, ग्राम सोन्याची चेन घेऊन टेंभूर्णीच्या दिशेने धूम ठोकली. ही घटना कुर्डुवाडी येथे टेंभूर्णी रोडवरील नेहरू नगरजवळील पुलावर आज मंगळवारी (दि.१०) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कांतीलाल बदरे यांच्या फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील एस टी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी कांतीलाल बदरे हे पत्नीसह करमाळा येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी टेंभुर्णीरोड साई कॉलनीमधून बसस्थानकाकडे पायी चालत जात होते. त्यावेळी नेहरूनगर जवळ दोन तोतयांनी सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करुन या वृद्ध दाम्पत्यांना अडवले.
काल कुर्डुवाडीमध्ये चोरी झाली आहे. तुम्हाला चेक करायचे आहे म्हणून खिसे चाचपू लागले. यावेळी फिर्यादी कांतीलाल यांनी खिशातील रुमाल पाकीट काढून दिले असता ते नको तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढा आणि रूमालात ठेवा, असे सांगितेले.
फिर्यादीने एक ग्रॅमचे बदाम असलेली २० ग्रॅम सोन्याची चेन स्वतः काढून रुमालात ठेवताच या दोघा तोतयांनी रुमाल घेऊन काळ्या रंगाच्या युनिकाॅर्न गाडीवरुन टेंभुर्णीच्या दिशेने धूम ठोकली. फिर्यादीने टेंभुर्णी रोडवरील मंगल कार्यालयापर्यंत त्यांचा पाठलाग केला पण ते सापडले नाहीत.
□ पोलिसांचे दुर्लक्ष
कुर्डूवाडी शहरात गेल्या एक महिन्यापासून घरफोड्या, मोटरसायकल चोरी, बाजारात मोबाईल चोरी, गुंडगिरी आदींचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा दुचाकीवर पोलिसांची पेट्रोलिंग व रात्री पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538051827872551/