■ विस्कळीत पाणी पुरवठा हे भाजप अपयश
सोलापूर : शहरात सध्या सर्वत्र विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने पावले उचलावीत, सध्याच्या अधिकार्यांना पाण्याचे नियोजन जमत नाही. त्यामुळे जुन्या अनुभवी अधिकार्यांना बोलवून लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी महापौर महेश कोठे यांनी आयुक्तांकडे केली. Call experienced officers, streamline water supply: Mahesh Kothe
शहर राष्ट्रवादीच्यावतीने सोमवारी आयुक्तांना विस्कळीत पाणीपुरवठ्याबद्दल निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, तौफीक शेख, किसन जाधव, नलिनी चंदले आदी उपस्थित होते. यावेळी कोठे म्हणाले की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचे नियोजन पूर्वीसारखे होण्यास वेळ लागत आहेत.
सध्याचे पाणीपुरवठ्याचे जे अधिकारी आहेत, त्यांना काम जमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापूर्वी दोन- तीन अधिकार्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले होते, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बोलावून पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे. तसेच हिप्परगा तलाव ते भवानी पेठेपर्यंत कॅनॉलद्वारे पाणी येत होते. मात्र अनेक शेतकर्यांनी कॅनॉल बुजवले आहेत, ते पालिकेने पुन्हा ताब्यात घ्यावे. त्याद्वारे थोड्या प्रमाणात पाणी मिळणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/537887774555623/
याशिवाय शहरात अनेक ठिकाणी विहिरीवर फिल्टरपंप बसवले आहेत, मात्र ते सध्या बंद अवस्थेत आहेत. ते पुन्हा दुरूस्त केल्यास लोकांना वापरण्यासाठी पाणी मिळेल. यावर आयुक्तांनी विचार करून योग्य नियोजन करू, असे शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी तौफीक शेख, किसन जाधव यांनीही हद्दवाढमधील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
■ विस्कळीत पाणी पुरवठा हे भाजप अपयश
विस्कळीत पाणी पुरवठा हे भाजपचे अपयश असून राष्ट्रवादीची सत्ता आल्यास शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करू, असे माजी महापौर महेश कोठे यांनी म्हटले आहे. भाजप आपले अपयश लपवण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन प्रशासनावर खापर फोडत आहेत.
भाजपला पाच वर्षे सत्ता सांभाळता आली नाही, स्थायी समिती चेअरमन निवडता आला नाही. दोन देशमुखांची भांडणे सोलापूरकरांनी पाहिली आहेत, सत्तेवर येण्यासाठी रोज पाणी पुरवठा करू, असे सांगितले पण ते त्यांना जमले नाही. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत आल्यास एक दिवसाआड पाणी पुरवठा करू, असे माजी महापौर महेश कोठे म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538023571208710/