पुणे : राज्यात आरोग्य भरती परीक्षा पुन्हा होणार आहे. परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी ही घोषणा केली आहे. यासंदर्भात टोपे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार आहेत. नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Health recruitment exam will be held again: Rajesh Tope
राज्यात मागच्या काळात आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत आश्वासन दिले होते. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहोत.
मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ. मंत्री मंडळाचा निर्णय आहे त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय ह्यात झाला असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/538003714544029/
आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे.
□ जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट
राज्यात जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचे असेल तर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या महिन्यात राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्र सध्या मास्क मुक्त आहे, परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सरकारकडून मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील असा अनुमान काढला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537887774555623/