》परंपरेला पायदळी तुडवले, समर्थक संतापले,
》संभाजीराजांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापले
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची कुलदेवता. दैनंदिन आद्य नैवेद्याचा पहिला मान याच छत्रपती घराण्याला. छत्रपतींचे वंशज आले की त्यांना थेट गाभाऱ्यात जाऊन पूजा-अर्चा करण्याचा मान. ही शेकडो वर्षांची परंपरा. पण याच परंपरेला तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर समितीच्या प्रशासनाने पायदळी तुडवले. चक्क आई तुळजाभवानीमातेसमोरच महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे संभाजीराजांचे समर्थक संतापले असून महाराजांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंदिरातूनच खडसावले आहे. Kulswamini honored by Chhatrapati family, insulted in front of Bhavani mother Tuljapur Sambhaji Raje
हा प्रकार सोमवारी तुळजाभवानी मंदिरात घडला. भाजपचे खासदार संभाजीराजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावेळी कुलस्वामामिनी नेहमी तुळजाभवानी मंदिरात गेले असता त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. या प्रकारामुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामि वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात.
तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर ते नेहमी ट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र सोमवारी ९ मे रोजी संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गाभाऱ्यात जाण्यापासून रोखत ही परंपरा पायदळी तुडवण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांना तात्काळ फोन लावून झालेल्या प्रकाराबद्दल सुनावले.
दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मातेच्या छत्रपती संभाजीराजे यांनी परंतु निगरगट्ट प्रशासनाला काहीही खेदजनक वाटले नाहीय या प्रकरणी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संबंधित मंदिर तहसीलदार व्यवस्थापक जनआंदोलन उभारू अशी उद्विग्न भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/538420607835673/
छत्रपती संभाजीराजे आणि धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी निलंबन करावे अन्यथा राज्यभर तुळजाभवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात. तेव्हा ते परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात. यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता, त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते.
□ मंदिर छत्रपती घराण्याच्या मालकीचे
तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. युवराज संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले. मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे. भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात.
□ ना निजामाने रोखले, ना ब्रिटिशांनी
पूर्वी हा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. त्यावेळी भवानी माता छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने देखील कधीही येथे हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम लादले नाहीत. त्यामुळे छत्रपती घराण्यातील प्रत्येक सदस्य तुळजापूरला आल्यानंतर गाभाऱ्यात जाऊनच विधिवत पूजा करून दर्शन घेतात. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही.
● धार्मिक व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी
या घटनेस जबाबदार असणारे मंदिर समितीचे धार्मिक व्यवस्थापक यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवार दिनांक १० रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी महेश गवळी, धैर्यशील कापसे, जीवन इंगळे, प्रशांत सोंजी, अजय साळुंके, अशोक फडकरी, भुजंग मुकेरकर आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538422741168793/