मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल बुधवारी (ता. 11) सायंकाळी त्यांचं निधन झालं. रमेस लटके हे 1997 साली प्रथम मुंबई महानगर पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. MLA Ramesh Latke dies ShivSena MLA Ramesh Latke dies in Dubai
दांडगा जनसंपर्क असलेल्या आमदाराच्या निधनानं मतदारसंघात देखील शोककळा पसरली आहे. ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती. गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता.
आमदार रमेश लटके यांनी तीन दिवसापूर्वी अंधेरी पूर्वेत होली फॅमिली ग्राउंड मध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमात मंत्री अनिल परब व मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते दुबईला आपल्या सहकुटुंब सोबत फिरायला गेले होते आणि काल दुबईमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539035914440809/
2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले होते. आमदार रमेस लटकेंच्या निधानानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. आमदार रमेश लटके यांचं पार्थिव मुंबईत आणण्यासाठी तायरी सुरू असून लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे.
आमदार रमेश लटके अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले.
यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.
1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539044634439937/