मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून आलेल्या पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील मयत हे औरंगाबाद तर दुसरा झारखंडमधील रहिवासी आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. Morning pickup collides with Eicher in Mohol, two killed Aurangabad Jharkhand
ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी ( १३ मे) पहाटे ५ वाजता देवडी पाटी परिसरातील हॉटेल श्रीकृष्णजवळ घडली आहे. या अपघातासंदर्भात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- कल्याणहून सोलापूरकडे घराचे सामान घेऊन निघालेला आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. ४३ बी.आर.५२५२) हा आज पाच वाजता देवडी गावाजवळ आल्यानंतर तेथील जवळील हॉटेल श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो थांबवला होता.
याचवेळेस पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप (क्रमांक एम.एच.२० इ एल ७२) गाडीने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख (वय २२, रा. वैजापूर औरंगाबाद ) व रिहान फैजल कयेशअल्ली (वय ३५,रा. झारखंड) हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539789984365402/
याप्रकरणी आयशर टेम्पोचा ड्रायव्हर चेतन बिभीषण खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात पथकाचे पोलीस कर्मचारी ज्योतीबा पवार हे पुढील तपास करीत आहेत.
□ सोलापुरात रात्री पाऊस
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या पंधरा दिवसांपासून शहराचे तापमान 42- 43 अंश सेल्सिअसपर्यंत होते त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते बुधवारी शहरात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला.
आज शुक्रवारी सकाळी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सात नंतर शहरात पावसास सुरुवात झाली. जवळपास तास ते दोन तास शहरात पाऊस सुरू होता. त्यामुळे सायंकाळनंतर हवेमध्ये गारवा निर्माण झाला. त्यामुळे शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या परिसरातही पाऊस पडल्याची माहिती आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539787964365604/