Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मोहोळमध्ये पहाटे पीकअप आयशरवर आदळला, दोन ठार

Morning pickup collides with Eicher in Mohol, two killed Aurangabad Jharkhand

Surajya Digital by Surajya Digital
May 13, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
मोहोळमध्ये पहाटे पीकअप आयशरवर आदळला, दोन ठार
0
SHARES
156
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून आलेल्या पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील मयत हे औरंगाबाद तर दुसरा झारखंडमधील रहिवासी आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे.  Morning pickup collides with Eicher in Mohol, two killed Aurangabad Jharkhand

ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी ( १३ मे) पहाटे ५ वाजता देवडी पाटी परिसरातील हॉटेल श्रीकृष्णजवळ घडली आहे. या अपघातासंदर्भात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- कल्याणहून सोलापूरकडे घराचे सामान घेऊन निघालेला आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. ४३ बी.आर.५२५२) हा आज पाच वाजता देवडी गावाजवळ आल्यानंतर तेथील जवळील हॉटेल श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो थांबवला होता.

याचवेळेस पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप (क्रमांक एम.एच.२० इ एल ७२) गाडीने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख (वय २२, रा. वैजापूर औरंगाबाद ) व रिहान फैजल कयेशअल्ली (वय ३५,रा. झारखंड) हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याप्रकरणी आयशर टेम्पोचा ड्रायव्हर चेतन बिभीषण खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात पथकाचे पोलीस कर्मचारी ज्योतीबा पवार हे पुढील तपास करीत आहेत.

□ सोलापुरात रात्री पाऊस

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा  दिलासा मिळाला.  गेल्या पंधरा दिवसांपासून शहराचे तापमान 42- 43 अंश सेल्सिअसपर्यंत होते त्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते बुधवारी शहरात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. 

आज शुक्रवारी सकाळी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते.  सायंकाळी सात नंतर शहरात पावसास सुरुवात झाली. जवळपास तास ते दोन तास शहरात पाऊस सुरू होता. त्यामुळे सायंकाळनंतर हवेमध्ये गारवा निर्माण झाला.  त्यामुळे शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.  दरम्यान अक्कलकोट,  मोहोळ,  पंढरपूर,  सांगोला,  मंगळवेढा या परिसरातही पाऊस पडल्याची माहिती आहे.

 

Tags: #Morning #pickup #collides #Eicher #Mohol #two #killed #Aurangabad #Jharkhand#मोहोळ #पहाटे #पीकअप #आयशर #आदळला #दोनठार #औरंगाबाद #झारखंड
Previous Post

कोणत्याही समाजातील पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा व कार्ये करून घ्या : प्रकाश आंबेडकर

Next Post

Diesel home delivery आता डिझेलची मिळणार होम डिलिव्हरी; भारतात 200 शहरात योजना राबवणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Diesel  home delivery आता डिझेलची मिळणार होम डिलिव्हरी; भारतात 200 शहरात योजना राबवणार

Diesel home delivery आता डिझेलची मिळणार होम डिलिव्हरी; भारतात 200 शहरात योजना राबवणार

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697