कोलकाता : मनोरंजन क्षेत्रातून दुःखद बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्री पल्लवी डेचा मृतदेह आढळला आहे. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. कोलकाता येथील गरफा येथील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. Shocking – Famous actress’s body found Pallavi Day
या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पल्लवी ही बंगाली टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री होती. प्राथमिक अंदाजानुसार हा आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय अभिनेत्रीचा आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. पल्लवीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिला तात्काळ बांगूरच्या रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. अभिनेत्री अंजना बसू शोमध्ये नकारात्मक भूमिकेत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541203894224011/
बंगाली अभिनेत्री पल्लवी डे ‘मन माने ना’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकरत होती. पल्लवीच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर तिला ‘Resham Jhanpi’ या टीव्ही शोमुळे खरी लोकप्रियता मिळाली. पल्लवीच्या जाण्यामुळं तिच्या चाहत्यांना धक्क बसला आहे. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या कठोर पाऊलामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पल्लवीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या बातमीने तिचे सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘मोन माने ना’ मध्ये काम करणारी को-स्टार अनमित्रा बताब्याल या बातमीने थक्क झाली आहे. ती म्हणाली, “मला प्रचंड धक्का बसला आहे. आम्ही 12 मे रोजी टेलिव्हिजन शोसाठी शूटिंग केले आणि नंतर तिच्याशी गप्पा मारल्या. मला अजूनही बातम्यांवर विश्वास बसत नसल्याचे म्हटले. पल्लवीच्या निधनाने तिच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.