Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Ujani light water चंद्रभागेत भरणेमामांच्या नावाने ‘म्हसोबा’ची स्थापना; आंदोलनाची तीव्रता वाढणार

ujani Pani Pandharpur will intensify the agitation

Surajya Digital by Surajya Digital
May 15, 2022
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
Ujani light water चंद्रभागेत भरणेमामांच्या नावाने ‘म्हसोबा’ची स्थापना; आंदोलनाची तीव्रता वाढणार
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी बारामती-इंदापूरला पळविणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उजनी धरण संघर्ष समितीने आज पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात आंदोलन केले. Establishment of ‘Mhasoba’ in the name of Bharanemama in Chandrabhaga; ujjani Pani Pandharpur will intensify the agitation

आंदोलनाचा भाग म्हणून नदीपात्रात पालकमंत्री भरणे यांच्या नावाने म्हसोबाची स्थापना करीत आंदोलकांनी पालकमंत्री भरणे यांचा निषेध केला. आंदोलनासाठी उजनी धरण संघर्ष समितीचे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत.

आज आंदोलनाला सुरवात झाली आहे. आज चंद्रभागेत भरणेमामांच्या नावाने म्हसोबाची स्थापना करून आंदोलन केले. उद्या आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे. सोलापूरच्या जलसंपदा कार्यालयाला वेढा घालून उद्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे खुपसे – पाटील यांनी सांगितले. सरकारने उजनीतील या पाणी चोरीला पायबंद न घातल्यास चंद्रभागेचे पाणी लाल होईल, असा इशारा खुपसे यांनी दिला आहे.

उजनी धरण संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूरला आंदोलनाची पहिली सुरवात केली. वर्षापासून आपण बघतोय की पालकमंत्री भरणे मामा आहेत आणि उजनीचे पाणी कंटिन्यू चोरायचा प्रयत्न गेल्या वेळेस शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तो हाणून पाडला. परत एक वर्षाने आम्हाला झोपेत ठेऊन डोक्यात दगड घालण्याचे काम भरणेमामांनी केलं. बारामतीकरांनी आणि भरणे मामांनी मिळून हे पाणी पळवण्याचे काम करत आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांना एवढ्यासाठीच केले आहे. सोलापूर वर लक्ष ठेवून आणि सोलापूरची दलाली मिळते ती बारामती पर्यंत पोहोचवणे, पण पैशाची दलाली कोरोच्या काळात इंजेक्शनची दलाली आलेला निधी त्या बाजूने न्यायचा, एकही ठोस निधी आणि ठोस योजना अडीच वर्षात केली नाही, अशी टीका उजनी धरण संघर्ष समितीच्या वतीने केली आहे.

कागदाचा खेळ करून उजनीचे पाणी घेऊन गेलं आहेत. पाठीमागची योजना आहे असं दाखवलं आणि साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी नेला, एका बाजूने मंगळवेढ्याचे योजना तशीच पडून आहे. अडीचशे कोटीची योजना दहिगाव योजना करमाळ्याची, माढ्यातली असेल आष्टी शिरापूर अपूर्ण योजना आहेत त्याला निधी दिला नाही.

भरणेमामा हे जिल्ह्याचे पालक हे पालकत्व सोडून इंदापूर आणि बारामतीला जोपासण्याचे काम करत आहेत. अजित पवार यांना खूष ठेवण्यासाठी सुप्रिया सुळे मतदारसंघ ठेवून त्या ठिकाणी त्यांना विजयी करण्यासाठी हा केलेला भरणे मामा चा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही लढाई उद्याची बारामतीकरांच्या विरोधातली लढाई राहील. या चंद्रभागेला भरणे मामाच पाय, हात लागले नाहीत. या ठिकाणी आम्ही भरणेमामाच्या नावानं भरणे मामा चा मसोबा म्हणून आम्ही स्थापन केलेला आहे. उद्या भविष्यातले बदलीसाठी मामाकडे पैसे घेऊन जायचं म्हणलं कॉन्ट्रॅक्ट मिळावा म्हणून पैसे घेऊन जायचं म्हटलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी येवून मसोबाला पाया पडले पाहिजे. आणि तिथून गेले पाहिजेत हे आमचं गांधीगिरीचा आंदोलन आहे.

उद्यापासून हे आंदोलन आक्रमक स्वरूप घेईल आणि जोपर्यंत पाण्याचा आदेश थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. शांत राहू तर भविष्यातील पिढी आम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून विठ्ठलाकडे पाहिलं जातं, चंद्रभागेकडे पाहिलं जातं. मात्र त्याला येणारे पाणीच भरणेमामांनी बंद केले आहे. यामुळेच उद्याच्या आंदोलनची सुरूवात सोलापूरपासून करणार असल्याचे अतुल खुपसे पाटील यांनी सांगितले.

या आंदोलनात उजनी बचाव पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, जलतज्ञ अनिल पाटील, लक्ष्मणराव धनवडे, दिपक चंदनशिवे, गणेश अंकुशराव, सोमेश शिरसागर, बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, दादा कोळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Tags: #Establishment #Mhasoba #name #Bharanemama #Chandrabhaga #Ujani #Pani #Pandharpur #intensify#चंद्रभागा #पंढरपूर #भरणेमामा #म्हसोबा #स्थापना #आंदोलन #तीव्रता #उजनी #पाणी
Previous Post

Oxygen tanker accident मोहोळ : सकाळची घटना; ऑक्सीजन टँकरची जीपला जोरात धडक; अनर्थ टळला

Next Post

Devendra fadanvis corporator – ‘बाबरी पाडायला गेलो होतो, तेव्हा मी नगरसेवक होतो’

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Devendra fadanvis  corporator  – ‘बाबरी पाडायला गेलो होतो, तेव्हा मी नगरसेवक होतो’

Devendra fadanvis corporator - 'बाबरी पाडायला गेलो होतो, तेव्हा मी नगरसेवक होतो'

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697