□ १ लाख ७० हजाराचा ऐवज मुलाने केला लंपास
मोहोळ – घर बांधायला आणि मुलीच्या लग्नाला जमा करून ठेवलेले पैसे आणि दोन तोळे सोने असा एकूण १ लाख ७० हजार रूपयाचा ऐवज चक्क मुलानेच लंपास केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात घडली. या प्रकरणी मुलाच्या वडिलांने मुलाविरोधात फिर्याद दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. The boy himself made a fuss in the house, beat the money on the house; The father lodged a complaint with the police
या बाबत मोहोळ पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील मौजे वाफळे येथील तानाजी देऊ नलवडे हे पत्नी मुलगा शहाजी आणि मुलगी हे वाफळे येथे राहण्यास आहेत. शेती व दुग्ध व्यवसाय करून आपली उपजीविका करत आपला उदरनिर्वाह करतात . झाले असे की काही दिवसांपूर्वी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ७० हजार रुपये हे घराचे बांधकाम आणि मुलीचे लग्न करण्याच्या उद्देशाने मुलाचे वडील तानाजी यांनी घरातील लाकडी कपाटात एका डब्यामध्ये ठेवले होते.
१४ मे रोजी तानाजी हे गावातील दुधडेअरीला दुध घालायला गेले आणि पत्नी घरात स्वयंपाक करण्याच्या नादात होती. त्यावेळी मुलगा शहाजी यांनी संधीचा फायदा घेत सदरची रक्कम आणि दागिने चोरून खिशात घातले. कोणी काय आपल्यावर संशय घेऊ नये म्हणून मी शेतात जातो आता लाईन आली आहे. विहिरीवरची मोटार चालू करतो, अशी थाप मारून घरातून निघून गेला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541827730828294/
रात्रीच्या दहा वाजले तरी मुलगा घरी येईना म्हणून तानाजी हे शेतात गेले त्यावेळी मुलगा शहाजी हा शेतात दिसलाच नाही नंतर त्यांनी घरी येऊन चौकशी केली तरीही कुठे थांगपत्ता लागेना. शेवटी संशय बळावल्याने तानाजी यांनी कपाटामधील ठेवलेली रक्कम आणि दागिने आहेत की नाहीत याची खात्री केली. त्यावेळी त्यांना कपाटातील डब्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले.
सदरचे दागिने आणि पैसे हे आपल्या मुलानेच घेऊन पळून गेल्याची खात्री झाली. याबाबत मुलाचे वडील तानाजी देऊ नलवडे यांनी मुलगा शहाजी तानाजी नलवडे याच्या विरोधात मोहोळ पोलिसात फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार आदलिंगे हे करीत आहेत.
□ अज्ञात वाहनाच्या धडकेनं व्यक्तीचा मृत्यू
बार्शी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनं एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील पांगरी येथील श्रीराम पेठेत घडली आहे. याबाबत स्वप्निल संजय चांदणे रा. श्रीराम पेठ, पांगरी (ता. बार्शी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पांगरी येथील रामा मारुती चांदणे व ऋषिकेश सतिश चांदणे हे नेहमीप्रमाणे पहाटे फिरावयास निघाले असता त्यांना फिर्यादीच्या घराजवळ अंदाजे 35 ते 40 वयोगटातील एक पुरुष जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे त्यांनी फिर्यादीस याची माहिती दिली. तिघांनी पाहणी केली असता जखमी व्यक्तीच्या अंगावर पांढर्या रंगाचा शर्ट व राखाची रंगाची हाप पँट होती. त्यास कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.
त्याच्या तोंडास व हातापायास मार लागला होता. त्यांनी त्यास पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यात हलविले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे हयगयीने, अविचाराने वाहन चालवून अज्ञात व्यक्तीस धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/541881577489576/