सोलापूर – घरात जेवण केल्यानंतर उलट्या आणि जुलाबाची लागण झाल्याने ७ जणांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना देशमुख बोरगाव (ता.अक्कलकोट) येथे आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. Food poisoning in Borgaon; Young man dies while swimming in Kondi Solapur crime
इमाम बागवान (वय १०वर्षे ) अबू सुफियान बागवान (वय १२) तोसिफ बागवान (वय १४) राजअहमद बागवान (वय ४०) रहमान बागवान (वय ७३) अब्दुल बागवान (वय ७१) आणि सैपन बागवान (वय ३० सर्व रा.देशमुख बोरगाव) अशी लागण झालेल्या रुग्णांची नावे आहेत. सकाळी आठ वाजेच्या सुमारास सर्वांनी जिलानी बागवान यांच्या घरात जेवण केले होते. त्यानंतर त्यांना उलट्या-जुलाब होत असल्याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
● मल्लिकार्जुन नगरात विवाहित इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरात राहणाऱ्या शरणप्पा इरण्णा बनशेट्टी (वय ४६) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रविवारी (ता. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541818407495893/
शरणप्पा बनशेट्टी याचा मृतदेह सकाळी १० वाजेच्या सुमारास छताच्या लोखंडी हुकाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयताच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तो इलेक्ट्रिशियन चे काम करीत होता. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
● कोंडी येथे पोहताना तरुणाचा विहिरीत मृत्यू
सोलापूर – विहिरीत पोहताना पाण्यात बुडाल्याने अजय प्रकाश चव्हाण (वय १९ रा.कोंडी ता.उत्तर सोलापूर) हा तरुण मरण पावला. ही दुर्घटना काल रविवारी (ता. 15) दुपारच्या सुमारास घडली.
अजय चव्हाण हा दुपारी एक वाजेच्या सुमारास गावातील मच्छिंद्र नीळ यांच्या शेतातील विहिरीत मित्रासोबत पोहायला गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाला. त्याला विहिरीतून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला.
मयत अजय चव्हाण हा एकुलता होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. वडील प्रकाश चव्हाण हे मजुरी करतात. तो नुकताच बारावी उतीर्ण झाला होता. अजय चव्हाण याने पोलिस होण्याचे स्वप्न बाळगून ॲकॅडमी जॉईन केला होता अशी माहिती नातेवाइकांनी दिली. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/541806664163734/