अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पुन्हा अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त दणका बसला. अनेक गावातील घरावरील पत्रे, झाडे व विद्युत खांबा उन्मळून पडले. काही भागात जोरदार गारपीट तर काही भागात जोरदार पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. Hail, heavy rain in Akkalkot; Farmers are struck by lightning
या पावसाचा शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व मशागतीसाठी फायदा होणार असले तरी तालुक्यात वारंवार वादळी पावसाच्या दणक्याने सामान्य नागरिक व शेतकरी हैराण झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात म्हैसलगी, खानापूर, तडवळ, दुधनी, वागदरी, हंजगी, हालहळ्ळी (अ), वागदरी व संपूर्ण तालुक्यात कमी अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. पाऊस कमी मात्र सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे नुकसान मात्र अधिक झाले.
काही भागात जोरदार वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे व अनेक झाडे उन्मळून पडले आहेत. सुलेरजवळगे, पानमंगरळ आदी भागात वादळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. तालुक्यात तडवळ व पानमंगरुळ भागात वाऱ्याचा व पावसाचा जोर अधिक होता. काही गावात मोठा पाऊस झाल्याने शेत शिवारात पाणी साचल्याचे दृश्य पहायला मिळाले. काही ठिकाणी काढणीस आलेल्या उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/543355947342139/
काही ठिकाणी वादळी वाऱ्याने वीज खंडित होऊन अनेक गावात रात्रभर अंधार होता. तर काही गावात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे, विद्युत खांब व झाडे पडून अनेक घरांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. हिळ्ळी येथे नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागली होती. हे दृश्य पहाण्यासाठी बघ्यांची हिळ्ळी गावात एकच गर्दी झाली होती.
मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. याचाच परिणाम सायंकाळी मोठ्याप्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पहायला मिळाली. अनेक गावातून वीज गायब झाल्याने घराघरातील विजेचे दिवे, फॅन, कुलर, एसी फक्त घरातील शोभेच्या वस्तू झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच उकाड्याने अंगाची लाहीलाही होत होती. अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. वयस्कर माणसे व मुक्या जनावरांचे हाल झाले. लोकानी मिळेल तेथे सावलीचा आसरा घेतला.
सायंकाळी सहानंतर अचानक वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. प्रारंभी हलकिशी वाऱ्याची झुळूक आल्याने उकाड्याने त्रासलेल्या जिवाला दिलासा वाटला. अचानक आकाशात विजा चमकू लागल्या. पुढे आणखी विजांचा कडकडाट वाढून तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. बघता – बघता वातावरण पावसाळ्यातल्यासारखे होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.
वारा आणि पाऊस एकत्र आल्याने जनावरांसह माणसांचेही हाल झाले. सर्वत्र शेती पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. जशी पावसाला सुरुवात झाली तशी गावागावातील वीज गायब होऊन अनेक गावे अंधारात बुडाली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/543339027343831/