□ अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी
अक्कलकोट : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तीव्र पाणी टंचाई भासणाऱ्या तब्बल 42 गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. जलजीवन मिशन योजनेतून 42 गावांसाठी 34 कोटी रुपयांच्या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. Akkalkot: MLA Sachin Kalyanshetti approves Rs 34 crore scheme for 42 villages
याकामी पुढील गावाना जनजीवन मिशन अंतर्गत 33 कोटी 90 लाख 79 हजार 208 रुपये इतकी निधीस प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक निधी अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी प्राप्त झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
मागील अनेक वर्षांपासून अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील सदर गावात दरवर्षी उन्हाळ्यात सतत तीव्र पाणी टंचाई भासत होते. यामुळे तेथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून नवीन योजने साठी आग्रहीचे मागणी येत होती. या योजनेतून सतत पाठपुरावा केल्याने समाविष्ट गावे आणि त्यासाठी तरतूद झालेली
रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
मिरजगी 82 लाख 86 हजार 74 2रुपये , केगांव (खु) 59 लाख 77 हजार 800 ,भोसगे 11लाख 26 हजार 964 ,सुलतानपुर 38 लाख 59 हजार 377,केगांव (बु) 65 लाख 40 हजार 200, रामपुर 21 लाख 14 हजार 756,नागुरे 86 लाख 24 हजार 267, सलगर 1 कोटी 27 लाख 66 हजार 4,किणी 94 लाख 33 हजार 581, बऱ्हाणपुर 41 लाख 86 हजार 382,चपळगाव 57 लाख 24 हजार 52,पितापूर 35 लाख 37 हजार 368, निमगांव 22 लाख 86 हजार 608,मुगळी 1 कोटी 18 लाख 52 हजार 755,
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/543355947342139/
संगोगी (आ) 61 लाख 21 हजार 943,तोरणी 74 लाख 40 हजार 617, चपळगाव (बावकरवाडी) 34 लाख 75 हजार 511, खैराट 94 लाख 29 हजार 739,कोन्हाळी 92 लाख 27 हजार 909, गोगांव 1 कोटी 21 लाख 38 हजार 945, नाविंदगी 58 लाख 89 हजार 693,कलप्पावाडी 1 कोटी 18 लाख 63925, कर्जाळ 1 कोटी 31 लाख 4 हजार 53, पालापूर 32 लाख 95 हजार 388,आळगे 1 कोटी 30 लाख 79 हजार 196,आंदेवाडी (बु) 1 कोटी 32 लाख 72 हजार 635,देवीकवठे 76 लाख 53 हजार 55, म्हैसलगे 1 कोटी 24 लाख 78 हजार 181,आंदेवाडी (खु) 36 लाख 36 हजार 693,घुंगरेगाव 25 लाख 36 हजार 872, मुंडेवाडी 1 कोटी 40 लाख 75 हजार 67,अंकलगे 1 कोटी 77 लाख 22 हजार 658, साफळे 59 लाख 78 हजार 714, कुमठे 41 लाख 63 हजार 578, गौडगांव खु. 40 लाख 80 हजार 45, बबलाद, परमानंद नगर तांडा 1 कोटी 68 लाख 20 हजार 338,मोट्याळ 34 लाख 71 हजार 31, तोगराळी 1 कोटी 1 लाख 22 हजार 91,शिंगडगांव 1 कोटी 33 लाख 30 हजार 679,तिल्हेहाळ 90 लाख 82 हजार 456, दर्गनहळ्ळी 1 कोटी 66 लाख 11 हजार 872, पिंजारवाडी 1 कोटी 1 लाख 17 हजार 536 रुपये अशा मंजूर रक्कमा आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
□ कायमस्वरूपी होणार सोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष हे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट तसेच दररोजचे होणारे त्रास कायस्वरूपी थांबावे हा आहे. यातून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा होणे हा उद्देश आहे. यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. याद्वारे या सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर पाण्याची कायमस्वरूपी सोय होण्यास मदत होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/543335537344180/