Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Dead bodies Ganges भयंकर ! गंगेच्या किनाऱ्यावर पुन्हा मृतदेहांचा खच

Awful! Dead bodies again on the banks of the Ganges

Surajya Digital by Surajya Digital
May 18, 2022
in Hot News, देश - विदेश
0
Dead bodies Ganges भयंकर ! गंगेच्या किनाऱ्यावर पुन्हा मृतदेहांचा खच
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पुन्हा एकदा गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मृतदेह दफन केले जात आहेत. फाफामऊ घाटावरील या भयानक दृश्याचे फोटो समोर आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत व किनाऱ्यावर मृतदेहांचा खच पाहायला मिळाला होता. त्या भयावह आठवणी पुन्हा जागा झाल्या आहेत. बंदी असतानाही परंपरेच्या नावाखाली गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेह दफन केले जात आहेत. Awful! Dead bodies again on the banks of the Ganges

मृतदेहांच्या प्रकरणाची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) गंभीर दखल घेतली आहे. यूपी आणि बिहारच्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिवांना (आरोग्य) तथ्यात्मक पडताळणी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. 2018 आणि 2019 मध्ये कोविड-19 सुरू होण्यापूर्वी आणि 2020, 2021 मध्ये कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर आणि 31 मार्चपर्यंत किती मानवी मृतदेह यूपी आणि बिहारच्या गंगा नदीत तरंगताना दिसले आणि किती नदी किनारी पुरण्यात आले याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सरकारने किती प्रकरणांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा दफन करण्यासाठी आर्थिक मदत केली? याबरोबर गंगा नदीत मृतदेह वाहून जाणे किंवा नदीच्या काठावर मृतदेहांचे दफन करणे थांबवण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली? असे प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. याशिवाय मृतदेह हाताळण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीविरुद्ध खटला चालवला गेला आहे का? असा प्रश्नदेखील खंडपीठाने विचारला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

एनजीटी आणि जिल्हा प्रशासनाने गंगेच्या घाटावर मृतदेह दफन करण्यास बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही परंपरेच्या नावाखाली ज्या प्रकारे मृतदेह दफन केले जात आहेत, ते अत्यंत चिंताजनक आहे. फाफमऊ घाटात दररोज डझनभर मृतदेह वाळूत पुरले जात आहेत. त्यामुळे तिथे सगळीकडे मृतदेहांचा खच दिसून येत आहे. वाळूत गाडलेले मृतदेह गंगेत तर वाहून जातातच, पण त्यामुळे नदीही प्रदूषित होते.

फाफामऊ घाटावर जो प्रकार पहायला मिळतो तो अतिशय चिंताजनक आहे, कारण इथे प्रशासनाच्या सूचनांची केवळ खिल्ली उडवली जात नाही, तर एनजीटीच्या सूचनांचेही खुलेआम उल्लंघन केले जात आहे. प्रत्यक्षात मान्सून येण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत गंगा नदीच्या काठावर जे मृतदेह पुरले जात आहेत, तेही नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास ते गंगेत मिसळण्याचा धोका आहे. वाळूत गाडलेले मृतदेह गंगेत तर वाहून जातातच, पण त्यामुळे नदीही प्रदूषित होते.

जिल्हा प्रशासनापासून ते महापालिकेपर्यंत त्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. मात्र, कोरोनाच्या काळात गंगेच्या काठावर वाळूत मृतदेह पुरल्याच्या बातम्या आल्यानंतर महापालिकेने शेकडो मृतदेह वाळूतून बाहेर काढून त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते, मात्र आता बंदी असतानाही येथे बिनधास्तपणे मृतदेह दफन करण्याचा खेळ सुरू आहे.

अंत्यसंस्कारासाठी फाफामऊ घाटावर पोहोचलेल्या लोकांनी घाटाची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. याकडे प्रशासन आणि महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप लोक करत आहेत. फाफामऊ घाटावर विद्युत स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कारासाठी लाकडे असल्यास अशा प्रकारे मृतदेह पुरण्याची गरज भासणार नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. दरम्यान काही लोक मृतदेह दफन करण्याची परंपरा असल्याचं सांगतात.

 

Tags: #Awful! #Deadbodies #again #banks #Ganges #yogigovernment#भयंकर #गंगा #किनाऱ्यावर #पुन्हा #मृतदेह #खच #योगी #सरकार
Previous Post

Rajiv Gandhi’s assassin राजीव गांधींच्या मारेकऱ्याला सोडण्याचे आदेश; 31 वर्षांनंतर सुटका

Next Post

State Kho Kho Competition राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा : मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
State Kho Kho Competition राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा : मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद

State Kho Kho Competition राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा : मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697