□ भाजपला रोखण्यासाठी प्रसंगी महाआघाडीबरोबर जाऊ
सोलापूर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी तयार आहोत, मात्र उजनीचे पाणी जर पालकमंत्र्यांनी पळवण्याचा प्रयत्न केल्यास आपण त्यांच्यासोबत जाणार नाही, अशी भूमिका माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी जाहीर केली. There is no alliance with NCP if Ujjain water is diverted: Adam Master on occasion to stop BJP Let’s go with the Grand Alliance
दत्तनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आडम मास्तर बोलत होते. माकप महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर वाटाघाटी करण्यास तयार आहे. याबाबत खा. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोला, असे सांगितले आहे, त्यांच्याशीही बोलणे झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र सध्या उजनीच्या पाणी प्रश्नी गोंधळ सुरू आहे. नेमके ते पाणी कुठले आहे याचा अद्याप खुलासा झाला नाही. जर राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी उजनीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न केल्यास आपण मात्र राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, स्वतंत्र लढू, असे मास्तरांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/543690170642050/
》भाजपला रोखण्यासाठी प्रसंगी महाआघाडीबरोबर जाऊ : आडम
महापालिकेत गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता होती. त्यांच्या काळात स्मार्ट सिटीच्या कामात शेकडो कोटी रुपये वाया गेले. पाच वर्षात त्यांना एकही काम करता आले नाही. आज पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे संपूर्ण जनता भाजपच्या कामगिरीवर नाराज आहे. याचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे त्यात माकप सहभागी होण्यास तयार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले.
दत्तनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मास्तर पुढे म्हणाले की, आज सोलापूर शहरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला काही अंशी काँग्रेस आणि जास्त करून भाजप जबाबदार आहे. आपण एकट्याने लढवून तीस हजार गरीब लोकांसाठी घरकुल निर्माण केले, त्यासाठी एनटीपीसीमधून पाणी आणले. केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठा निधी आणला मात्र दुसरीकडे भाजपकडे सत्ता असतानाही त्यांना उजनीची पाईपलाईन करता आली नाही. रोज पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले होते, मात्र पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
गरिबांसाठी अनेक योजना असताना एकही योजना राबवली गेली नाही. गटबाजी आणि भ्रष्टाचारामुळे चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष बसवता आला नाही. यासह अनेक कारणामुळे भाजप बद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडी एकत्र लढावे तसे झाल्यास माकप त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहेत. त्यांनी एक कार्यक्रम लेखी स्वरूपात आमच्या समोर ठेवावा, आम्ही तो स्वीकारू , भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने केलेले सर्व अपमान आम्ही विसरून महाआघाडीत जाऊ. महाआघाडीने आपापसात भांडण केल्यास पुन्हा भाजपचा फायदा होणार आहे, असेही आडम मास्तरांनी आपले मत नोंदवले.
● माकप स्वतंत्र लढण्यासही तयार
माकपने स्वतंत्र लढण्याची तयारीही केली आहे. आम्ही तिन्ही मतदारसंघात मिळून २५ उमेदवार उभे करू. त्यात किमान १० ते १२ उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करू. माकपचे नगरसेवक जर पालिकेत गेले तर भ्रष्टाचार मिटवण्याचा प्रथम प्रयत्न करतील, असे आडम मास्तर यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/543768447300889/