मुंबई : केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादक शुल्क कमी केले होते. केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे. Maharashtra government’s big announcement; Petrol – Diesel cheaper
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती आणि दर कमी करण्यास सांगितले होते. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे.
काल, शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. केंद्राने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती.
यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, असं बोललं जात आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545927740418293/
व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.
इंधनाच्या दरात आजपासून कपात केल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या 45 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यानंतर 22 मे रोजी केंद्राकडून दर कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. दर कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार कधी घेणार याकडं लक्ष लागलं होते. विरोधकांकडून टीका होत होती. महाराष्ट्र सरकारही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.
● आषाढीला पालखी सोहळ्यांसोबत 40 टक्के भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज
#आषाढी #पालखी #सुराज्यडिजिटल #palkhi #surajyadigital #2years
दोन वर्षांनंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होण्याचे अंदाज आहे. पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या भाविकांच्या संख्येत तब्बल 40 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीने व्यक्त केला. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मुक्काम, भोजन, विश्रांती, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/545736590437408/