● राज ठाकरे यांच्या मोदींकडे तीन मोठ्या मागण्या
● आपल्या प्रकृतीसंदर्भात आणि ऑपरेशनविषयी दिली माहिती
पुणे : राज ठाकरे म्हणाले की, ‘अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्ताने एक सापळा रचला गेला. मी हट्टाने अयोध्येला जायचे ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही’. Raj Thackeray made a demand to the PM, gave information about the nature operation
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष्य होते. या सभेत त्यांनी बंधू तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषा वापरली.
अयोध्येचा दौरा तूर्तास स्थगित केला आहे. अयोध्या दौरा हा कार्यकर्त्यांना केसेसमध्ये अडकवायचा ट्रॅप होता. निवडणुकीत माझे कार्यकर्ते तिकडे अडकले असते. त्यामुळे माझी ताकद संपविणार नाही. माझ्या विरुद्धचा ट्रॅप मला समजला. त्यामुळे मी दौरा स्थगित केला आहे. अयोध्या दौऱ्याविरोधात रसद राज्यातून पुरवली गेली, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.
भाजप खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्या आव्हानालाही राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, यातून चुकीचे पायंडा पडत आहेत, गुजरातमधून कोणाला माफी मागायला लावणार आहात ते सांगा. हे आंदोलन आपल्याला सुरुच ठेवायचे आहे. एकदाच काय तो तुकडा पडून जाऊ दे, असे राज म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545947180416349/
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणाले, आंदोलनाची एक तरी केस अंगावर आहे का? शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवत असल्याची टीका यावेळी केली. शरद पवार यांनी बाळासाहेब आणि आमच्यात टीका होत असल्याचे सांगितले. मात्र, संध्याकाळी आम्ही एकत्रित चर्चा करत होतो, असे एका कार्यक्रमात सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवत, असे ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रमुख 3 मागण्या केल्या आहे. “लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अजून एक कायदा करणे गरजेचे आहे. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करुन टाका, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, माझ्या पायाची शस्त्रक्रिया करायची म्हणून आयोधा दौरा स्थगित केल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
आज त्यांनी स्वत: आपल्या प्रकृतीसंदर्भात अपडेट दिलं. त्यांचं 1 जून रोजी ऑपरेशन होणार आहे. याबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या 1 तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं, असं म्हणत राज ठाकरेंनी टोला लगावला, ज्यानंतर सर्वत्र हशा पिकला.
पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन-चार आठवडे रिकव्हरीसाठी जाईल. त्यानंतर महिना-दोन महिन्यांनी पुन्हा तुमच्यासमोर येईन. तूर्तास हे आंदोलन चालू ठेवायचं आहे. त्यासाठीचं पत्र सर्व हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ज्यांना मनसेचे हिंदुत्व, भोंगा आंदोलन खुपले, ते सर्व एकत्र आले. सर्व ढोंगी आहेत, त्यांचे हिंदुत्व म्हणजे नुसती पकपक आहे. आम्ही रिझल्टस् देतो, आमचे हिंदुत्व रिझल्टस देणारे, आम्ही मराठी जनतेला रिझल्टस् देतो! मनसेची आंदोलने होतील, होतच राहतील, वकिलांची टीम तयार आहे! भोंगा आंदोलन सुरूच राहील. शस्त्रक्रियेनंतर, विश्रांती घेऊन दीड-दोन महिन्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
□ ‘अरे तु काय सरदार पटेल आहेस का?’ उद्धव ठाकरेंना सवाल
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना?… अरे तू कोण आहे?, सरदार वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/545708443773556/