Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक

Farmers worried, Maharashtra has 17.5 lakh tonnes of sugarcane left

Surajya Digital by Surajya Digital
May 22, 2022
in Hot News, महाराष्ट्र, शिवार
0
शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : यंदाचा उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. आमचा ऊस कारखान्याला जाणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. Farmers worried, Maharashtra has 17.5 lakh tonnes of sugarcane left

यंदाच्या वर्षी अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्मण झाला आहे. हा गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदाच्या वर्षी उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अद्यापही राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील ऊस गाळपाविना रानात उभा आहे.

सध्या बीडमध्ये 4 लाख टन,जालना 3.90 लाख टन,अहमदनगर 3 लाख टन, लातूर 2.42 लाख टन, उस्मानाबाद 2.38 लाख टन,
सातारा 1 लाख टन, नांदेड 63 लाख टन, नांदेड येथे 63 लाख टन ऊस शिल्लक आहे. औरंगाबादमध्ये 50,000 टन परभणीत 30,000 टन ऊस शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दली आहे.

महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राहिलेल्या या उसाचे गाळप या महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले. दरम्यान, 2022-23 मध्ये ऊस गाळपाचे नियोजन थोडे लवकर सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतर राज्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यात सुमारे 17.5 लाख टन ऊस गाळप होण्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्याच्या काही भागात यंदाचा ऊस गाळप हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकतो अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे 17.5 लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस 31 मे पर्यंत गाळप केला जाईल. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले. इतर राज्यातून 129 हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या 29 हार्वेस्टर काम करत असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. राज्यात 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी (2021-22) हा आकडा 2.25 लाख हेक्‍टरने वाढून 13.67 लाख हेक्टर झाला आहे. गतवर्षी 1 हजार 13.31 लाख टन उसाचे गाळप झाले होते.

यावर्षी (16 मे पर्यंत) 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आत्तापर्यंत गाळपात 287.31 लाख टनांची वाढ झाली आहे. राज्यात 30 हून अधिक साखर कारखाने सुरु राहू शकतात. 15 मेपर्यंत राज्यातील एकूण 199 साखर कारखान्यांपैकी 126 कारखान्यांनी या हंगामासाठी त्यांचे कामकाज बंद केले आहे. 25 मे पर्यंत हा आकडा 163 पर्यंत जाऊ शकतो. उर्वरीत 36 साखर कारखाने उसाचा साठा संपेपर्यंत काम सुरु ठेवू शकतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी (2021-22) हा आकडा 2.25 लाख हेक्‍टरने वाढून 13.67 लाख हेक्टर झाला आहे. गतवर्षी 1 हजार 13.31 लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यावर्षी (16 मे पर्यंत) 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आत्तापर्यंत गाळपात 287.31 लाख टनांची वाढ झाली आहे. राज्यात 30 हून अधिक साखर कारखाने सुरु राहू शकतात. 15 मेपर्यंत राज्यातील एकूण 199 साखर कारखान्यांपैकी 126 कारखान्यांनी या हंगामासाठी त्यांचे कामकाज बंद केले आहे. 25 मे पर्यंत हा आकडा 163 पर्यंत जाऊ शकतो. उर्वरीत 36 साखर कारखाने उसाचा साठा संपेपर्यंत काम सुरु ठेवू शकतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

Tags: #Farmers #worried #Maharashtra #17.5lakh #tonnes #sugarcane #left#शेतकरी #चिंता #वाढली #महाराष्ट्र #17.5लाखटन #ऊस #शिल्लक
Previous Post

आमचे नेते कोणत्याही जातीबद्दल अनुचित बोलणार नाहीत – शरद पवार

Next Post

“माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली “

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
“माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली “

"माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली "

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697