पुणे : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात काही ब्राम्हण संघटनांची बैठक घेतली. “काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटलं. मात्र, मी मागास घटकांना आरक्षण द्यावंच लागेल असं सांगितलं. तसेच आरक्षणाला विरोध करू नये, असंही मी सांगितलं, असे पवार म्हणाले. तसेच कुठल्याही जात, धर्म याविरोधात कोणीही वक्तव्य करू नये असं मी पक्षातील नेत्यांना सांगितलं आहे. असेही शरद पवार या बैठकीत म्हणाले. Our leaders will not speak inappropriately about any caste – Sharad Pawar Brahmin Samaj Baitak
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राम्हण संघटना यांच्यात आज पुण्यात बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने बेताल वक्तव्य करणाऱ्य नेत्यांवर आळा घातला पाहिजे. जे कोणी जातीवादी बोलणार असतील तर त्यावर आम्ही चर्चा करू. पवारांनी आमच्या अनेक शंकांचे निरसन करण्याच काम केलं. भगवान परशुराम महामंडळ मिळालं पाहिजे ही आमची मागणी होती. ते लवकरच मुख्यमंत्री सोबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती सभेत बैठकीत असणाऱ्या गोविंद कुलकर्णी यांनी दिली.
राष्ट्रवादी पक्षातील काही सहकाऱ्यांच्या विधानामुळे ब्राम्हण संघटनांमध्ये अस्वस्थता होती. कोणत्याही जाती धर्माबद्दल अशी विधाने होऊ नयेत. यापुढे कोणत्याही जाती धर्मांबाबत आक्षेपार्ह विधान करू नयेत, अशी समज पक्षातील सहकाऱ्यांना देणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
९ ते १० ब्राम्हण संघटनांच्या ४० प्रतिनिधींनी शनिवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेऊन काही मुद्द्यांवरील आपली अस्वस्थता मांडली. त्यानंतर पवारांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींनी मला भेटून पक्षातील सहकाऱ्यांच्या विधानामुळे ब्राम्हण संघटनांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडले. मागास वंचित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मते सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांचे म्हणणे यावर सखोल चर्चा झाली. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा पवारांनी अशा प्रकारची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक आहे. ब्राह्मण समाजातील काही घटक त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे. त्यामुळेच पवारांनी आज ब्राह्मण समाज प्रतिनिधीची बैठक घेतली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545380077139726/
शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना आज चर्चेसाठी निमंत्रण दिले होते.
राष्ट्रवादीचे नेते वारंवार ब्राह्मणविरोधी वक्तव्ये करतात. इस्लामपूरच्या सभेत अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची चेष्टा केली. तर कोल्हापूरच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाला टार्गेट करताना पूजाविधी करणे हा ब्राह्मण समाजाचा धंदा आहे, असे वक्तव्य केले होते.
शरद पवारांनी देखील एका सभेत शाहू महाराज – ज्योतिषाचे उदाहरण दिले. एकंदरीतच अशा वक्तव्यातून राष्ट्रवादीचे ब्राह्मण समजाबाबतचे मत दिसून येते. पवारांनी ब्राह्मण समाजाबाबत प्रथम त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नंतरच आम्ही चर्चेला जाऊ असे म्हणत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या चर्चेचे निमंत्रण धुडकावले.
शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह दिसले. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी या बैठकीला जाणार नसल्याचे सांगत चर्चेवर बहिष्कार घातला. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले तर अन्य संघटनांनी या बैठकीला हजेरी लावली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/545345040476563/