अक्कलकोट : आज देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे.पेट्रोल,गॅस च्या किंमती सर्वसामान्य माणसांच्या अवाक्या बाहेर जात आहे.यामुळे सामान्य माणसांना जीवन जगणे मुश्किल झाल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. Ceremony concluding the crushing season of ‘Gokul Sugar’, Darshan of Gandhigiri at the farmers’ meet
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड ने यंदाच्या विक्रमी गाळप हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आज कारखानास्थळावर भव्य शेतकरी स्नेहमेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना सामाजिक न्याय मंत्री ना धनंजय मुंडे हे बोलत होते.
शेतकरी स्नेहमेळावा व कृषि प्रदर्शन कार्यक्रमासाठी येणार्या प्रत्येक शेतकरी,सामान्य नागरिक,कर्मचारी व अधिकारी यांना गोकुळ शुगर इंडस्ट्रिज च्या वतीने प्रवेशद्वारावर गळ्यात टाॅवेल, डोक्यावर टोपी व कुंकू लावून स्वागत करण्यात येत होता. यामुळे संपूर्ण शेतकरी मेळाव्यात गांधीगिरीचे दर्शन हे प्रमुख आकर्षण ठरत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजयमामा शिंदे,माजी आमदार दीपक साळुंके-पाटील, लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष पवार, ज्येष्ठ नेते बलभिम शिंदे, गोकुळ शुगर चे चेअरमन दत्ता शिंदे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिल चव्हाण यांची उपस्थिती होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545067217171012/
धनंजय मुंडे म्हणाले की, भगवानराव शिंदे यांच्या निधनानंतर कारखान्यावर अनेक संकट आली. अशा संकटावर मात करीत यंदा गोकुळ शुगरने सात लाख 71 हजार मेट्रिक टन उस गाळप करुन कारखाना नावारुपाला आणणे हे सामान्य काम नाही. गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे व शिंदे परिवाराचे कौतुक करुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, यापुढे कारखाना चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करु. चांगल्या कामाची जबाबदारी घेणे हे आमचे काम आहे. ऊस कारखान्याला जाऊन पंधरा दिवसात बील अदा केल्यास ऊस मागायचे वेळ येणार नसल्याचे सांगितले.
चेअरमन दत्ता शिंदे प्रास्ताविकेत म्हणाले, कारखाना अडचणीत असताना यावर्षी उत्कृष्ट नियोजन करून गोकूळ शुगरने विक्रमी गाळप केले आहे. तसेच कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिलेला विश्वास आणि गाळपाचे उद्दिष्ट सहजरीत्या पूर्ण करता आले. त्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी कुरनुरचे सरपंच व्यंकट मोरे, चिदानंद पाटील,सिद्रामप्पा यारगले, तुकाराम बिराजदार, दिलीप काळजे, व्यंकट मोरे,राजू चव्हाण, सरपंच उमाकांत गाढवे, धोत्री, बोरेगाव, डोंबरजवळगा, मुस्ती, किणी आदी गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुका, सोलापूर जिल्हा व तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, गोकुळ शुगर चे अधिकारी व कर्मचारी, व्यापारी, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर आभार जनरल मॅनेजर प्रदीप पवार यांनी मानले.
□ शेतकऱ्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सर्व पक्षात शेतकऱ्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सांगितले. भाजप सरकारच्या काळात कर्जमाफी देण्यासाठी पाच वर्षे लागले, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच पंधरा दिवसात दोन लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली. त्याच बरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे मंत्रीमंडळात निर्णय झाल्याचे सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/545380077139726/