सोलापूर / मोहोळ : सोलापुरात आज दोन अपघात झाले असून यात आठजण ठार झाल्याची माहिती आहे. यात डॉक्टर दाम्पत्याचा समावेश असून एका पाचवर्षीय मुलाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. एक अपघात मोहोळ तालुक्यातील पेनूर गावाजवळ तर दुसरा सांगोल्यात झाला. Two accidents in Solapur; Eight killed along with doctor couple Sangola Mohol Penur
मोहोळ- पंढरपूर महामार्गावर पेनूर गावाजवळ आज रविवारी (दि. 22) भीषण अपघात झाला. या अपघातात डाॅक्टर दाम्पत्यासह सहा जण जागीच ठार झाले. नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनूर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात झाला.
सर्व मृत हे मोहोळ शहरातील आहेत. दरम्यान, अपघातातील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. आफरिन अत्तार (वय 30), पती डॉ. मुजाहिद ईमाम अत्तार (वय 35), मुलगा अरमान मुजाहीद आतार (वय 5 ), मेव्हणे इरफान खान, त्यांची पत्नी व त्यात दोन मुलं असे ६ जण जागीच ठार झाले आहेत. कारमधील अनिल हुंडेकरी (वय 35 ) मनीषा मोहोन हुंडेकरी (वय 30 रा. गादेगांव ता.पंढरपूर) अरहान ईरफान खान ( आतार वय 10 रा. मोहोळ) त्यांना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी सोलापूरला रवाना केल्याची माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/545708443773556/
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर – मोहोळ महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण हाेती की, सहाजण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नी, मेव्हणे व त्यांची पत्नी तसेच त्यांच्यासह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
चारपदरी रस्ता झालेला असताना समोरासमोर अपघात कसा झाला, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. डॉ.अत्तार हे पंढरपूरहून मोहोळकडे निघाले होते, तर कारमधील प्रवासी सोलापुरातून लग्न आटपून पंढरपूर येथील गादेगावकडे निघाले होते.
● सांगोल्यातील अपघातात दोन ठार
सोलापूर : सांगोला तालुक्यातील चिकमहुद दिघंची रोडवर भरधाव टिपरने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली यात दोन जागीच ठार झाले आहेत. हा अपघात आज रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला.
या अपघातात दोन जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सांगोला पोलिसांनी दिली आहे. सुशांत जाधव (रा. वरकुटे) व मंगेश पिसे (स. वरकुटे) असे अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.यावेळी सागर जावीर, वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तत्काल १०८ या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले.
चिकमहूदजवळील धोकादायक वळणावरील एका हॉटेलसमोर घडला. घटनास्थळी सांगोला पोलिसांचे पथक दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/545947180416349/