सोलापूर – शेतातील आंब्याच्या बागेतून चोरट्यांनी ५० डझन हापूस आंबे चोरून नेल्याची घटना पांडवाची पोफळी (ता. मोहोळ) येथे काल शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. Theft of 50 dozen hapus mangoes from a field in Mohol; Suicide of a young woman in Solapur
यासंदर्भात विठ्ठल धर्मा वाघमारे (वय ७० रा. पांडवाची पोफळी) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली. चोरट्यांनी काल पहाटेच्या सुमारास आपल्या शेतातील बागेतून ५० डझन हापूस आंबे (कच्चे) चोरून नेले. त्याची किंमत १० हजार रुपये इतकी असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार चवरे पुढील तपास करीत आहेत .
□ साईनाथ नगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – अमन चौक परिसरातील साईनाथ नगर भाग २ येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
पूजा रामचंद्र गायकवाड (वय २६ रा.१४५ साईनाथ नगर २) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. काल
शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिने घरातील छताच्या लोखंडी पाइपला ओढणीने गळफास घेतली होती.
तिला फासातून सोडवून भाऊ (शुभम) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली. मयत पूजा गायकवाड यांच्या पश्चात आई वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार मणुरे पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/546124343731966/
□ नवरदेवाच्या कट्यारीने मारहाण तरुण जखमी
सोलापूर – लग्न मंडपात नवरदेवाची कट्यार घेतल्याच्या कारणावरून लाथाबुक्या आणि कट्यारीने झालेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला. ही घटना सलगरवस्ती परिसरातील परिसरातील सुवर्णा मंगल कार्यालयात आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
प्रीतम चंद्रकांत गायकवाड (वय २१ रा. शहानगर, लिमयेवाडी) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने नवरदेवाची कट्यार घेतली होती. तेंव्हा नवरदेवाकडील रमेश गायकवाड यांच्यासह १० जणांनी त्याला हाताने मारहाण करून त्याच कट्यारीने डोक्यात वार केला, अशी नोंद सलगर वस्ती पोलिस आज झाली आहे .
□ कामती येथे शेतमजूरास मारहाण, दोघे जखमी
सोलापूर : कामती येथील दत्तात्रय वानकर यांच्या शेतात लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत दत्तात्रय शंकर होनेनवरू (वय ३४) आणि सादीक इसाक मुल्ला (वय २३ दोघे रा.देगाव,वानकर वस्ती) हे दोघे मजूर जखमी झाले. ही घटना काल शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. भीमा क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघांनी विनाकारण मारहाण केली, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ गार्डी येथे आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : गार्डी (ता.पंढरपूर) येथे राहणाऱ्या सत्यवान जंगलु शिंदे (वय ३२) याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/546102413734159/