नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख, कुख्यात दहशतवादी यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, मलिकला 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दिल्लीच्या एनआयए कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, यासिन मलिकला होणारी शिक्षा रोखण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोदी सरकारला सर्व देशांनी विरोध करण्याचे आवाहन केले आहे. Notorious terrorist Yasin Malik sentenced to life imprisonment; Pakin Aala Yasin’s Pulka
कुख्यात दहशतवादी यासिन मलिक याला आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी मात्र या शिक्षेला विरोध केला आहे. काश्मिरी नेता यासिन मलिकविरोधात मोदी सरकारच्या फॅसिस्ट रणनीतीचा मी तीव्र निषेध करतो. यासीन मलिकला बेकायदेशीर शिक्षा दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने मोदी सरकारच्या कारवाईला विरोध केला पाहिजे, असं त्यांनी म्हंटल.
विशेष एनआयए न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी हा निकाल सुनावला. कोर्टानं त्याला यापूर्वीच या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. याप्रकरणी आज सकाळी अंतिम सुनावणी झाली होती तेव्हा एनआयएनं मलिकच्या फाशीची मागणी कोर्टाकडं केली होती. या सुनावणीनंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, मलिकला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
यासिन मलिकने कोर्टात सांगितले की, मला बुऱ्हान वाणीच्या चकमकीनंतर 30 मिनिटांत अटक करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयींनी मला पासपोर्ट दिला होता. भारतात मला निवेदन सादर करण्यास सांगितले. मी गुन्हेगार नसल्याचे मलिकने कोर्टात सांगितले. मी 1994 मध्ये हिंसाचाराचा मार्ग सोडला आणि महात्मा गांधींच्या तत्वांवर चालण्यास सुरुवात केली. तेव्हापासून काश्मीरमध्ये अहिंसक आंदोलन करत असल्याचे मलिक याने कोर्टात सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547874350223632/
राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) विशेष कोर्टानं १९ मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबध कायद्यांतर्गत (UAPA) सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आज सुनावणी सुरु होताच एनआयएनं दोषी मलिकच्या फाशीची मागणी केली होती. सर्व पक्षांचा शेवटचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं याप्रकरणाचा निर्णय दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राखीव ठेवला होता. पण कोर्टानं अखेर जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं.
यासिन मलिक विरोधात युएपीए कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय, भारतीय दंड विधान कायद्यातील 120-ब (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, श्रीनगरमधील मैसुमा भागात यासीन मलिक समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यासीनच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. खबरदारी म्हणून सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्रशासनाने श्रीनगरमध्ये तत्काळ प्रभावाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर शहरही बंद करण्यात आले आहे. निकालापूर्वी श्रीनगरजवळील मैसुमा येथील यासीनच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. सध्या परिसरात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. यासीन मलिकच्या घराबाहेर ही दगडफेक आणि निदर्शने करण्यात आली.
Terror funding case: NIA court sentences Yasin Malik to life imprisonment
Read @ANI Story | https://t.co/o6ffwlzZww#NIA #YasinMalikConvicted #Yasin_Malik pic.twitter.com/guU42LmAyq
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2022