Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Akluj Gold fraud अकलूजमध्ये तीस लाखाचे सोने वीस लाखात देतो म्हणून फसवणूक

पंढरपूर बसस्थानकावर मंगळसूत्र चोरीचे प्रमाण वाढले

Surajya Digital by Surajya Digital
May 25, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
Akluj Gold fraud अकलूजमध्ये तीस लाखाचे सोने वीस लाखात देतो म्हणून फसवणूक
0
SHARES
329
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज : तीस लाख रुपयाचे कस्टमचे सोने अवघ्या वीस लाख रुपयात देतो म्हणून अकलूजमध्ये एकाची फसवणूक झाल्याचे उघडकीस आलंय. यासंदर्भात अकलूज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. 30 lakh gold in Akluj for Rs 20 lakh fraud as Pandharpur Mangalsutra bus stand

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी विजय शिवाजी भोंडवे व जयदीप विजय भोंडवे (रा. निढळ ता. खटाव जि. सातारा) यांनी अकलूज येथील बाबासाहेब मारुती भोळे (रा. राऊतनगर, अकलूज) यांच्याकडून तीस लाख रुपये किंमतीचे कस्टमचे सोने अवघ्या वीस लाख रुपयात देतो, असे म्हटले.

यासाठी रोख सोळा लाख व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव तालुका खटाव खाते क्रमांक ६८०२३२२८१८५ या खात्यावर वेळोवेळी चार लाख रुपये असे वीस लाख रुपये भरण्यात आले. मात्र पैसे भरूनही सोने मिळत नसल्याने फिर्यादी बैचेन झाली. वारंवार विचारणा करूनही उचित उत्तर मिळत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.

सोने मिळत नसल्याने फिर्यादी भोळे यांनी पैशाची मागणी केली असता आरोपींनी अकलूज येथे येवून शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली असल्याची फिर्यादीत म्हटले आहे. अकलूज पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

यासंदर्भात सदर आरोपीवर भादवि कलम ४२०,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी विजय भोंडवे यांना ताब्यात घेतले असून २७ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा आधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मारकड हे करीत आहेत.

 

□ पंढरपूर बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी 

पंढरपूर :  महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याची घटना पंढरपूर येथे समोर आली असून सदर प्रकार पंढरपूर बस स्थानक घडलेला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकी वरून पळून जाण्याचे प्रकार पंढरपुरात नेहमीच घडत असतात.

बस स्थानकावर बसमध्ये चढताना घाईत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील पैशाचे पाकीट, मोबाईल, आणि महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याचे प्रकार ही पंढरपुरात नवीन नाहीत. बसमध्ये जागा मिळवण्याच्या हेतूने बसमध्ये चढण्यासाठी प्रवासी चढत असताना  त्यावेळी प्रवासात मोठ्या प्रमाणात ढकला ढकली आणि रेटारेटी होत असते. कोण कोणाला ढकलतो आणि कुणाचा कुणाला धक्का लागतो हे कुणी पाहात देखील नाही. याचाच फायदा चोरटे उठवीत असतात. प्रवासी असल्याचे नाटक करीत प्रवाशांच्या गर्दीत चोर घुसून चोरी करतात.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

या गर्दीत सफाईदारपणे चोरी करून हळूच मागे पसार होतात. आपली चोरी झाली हे लक्षात येईपर्यंत बराच अवधी निघून गेलेला असतो. तोपर्यंत चोरटा तेथून प्रसार झालेला असतो. कोरोनाच्या काळात आणि नंतर एसटी कर्मचारी संपामुळे  लालपरी बंद होती. त्यामुळे बस स्थानकात शुकशुकाट होता. काही दिवसांपूर्वीच लालपरी रस्त्यावर धावायला लागली. आता प्रवाशांच्या संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढायला लागली.

यातच चोरांचा वावर देखील पंढरपूर बस स्थानकाच्या आवारात सुरू झाल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पंढरपूर बस स्थानकावर एक महिला एसटीमध्ये चढत असताना तिच्या गळ्यातील 50 हजार रुपयाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी पळवलेची घटना घडली आहे. इंदापूर  येथील शुभांगी यादव व त्यांचे पती आणि मुलासोबत मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथे गेल्या होत्या. नातेवाईकांना भेटून त्या परत आपल्या गावी निघाल्या असताना पंढरपूर बस स्थानकावर ही घटना घडली आहे.

यादव कुटुंब आपल्या गावी परतण्यासाठी पंढरपूर बस स्थानकावर आले असताना काही वेळ बस येण्याची त्यांनी वाट पाहिली. नंतर पंढरपूर अकलूज बस येऊन उभी राहिले असता अकलूजकडे जाणाऱ्या बसमध्ये गर्दी कमी प्रमाणात असल्याने अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा करीत बसले होते. त्यातच पंढरपूर बस स्थानकावर बस लागताच प्रवासी गर्दी करून बस मध्ये चढण्यासाठी दरवाजापाशी एकच झुंबड उडाली.

प्रवाशांची गर्दी झालेली असताना यादव कुटुंब देखील या बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी शुभांगी यादव यांच्या हातावर मंगळसूत्राचे काही मणी खाली जमिनीवर पडले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याचे त्वरित लक्षात आले. परंतु तोपर्यंत पंढरपूर बस स्थानकातील चोरटा पसार झाला होता.

या घटनेबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास पोलीस नाईक  मुलाणी हे करीत आहेत. पूर्वीप्रमाणे बसस्थानकावर असणारा पोलिस बंदोबस्त आता दिसेनासा झाला आहे.

 

Tags: #30lakh #gold #Akluj #20lakh #fraud #Pandharpur #Mangalsutra #busstand#अकलूज #तीसलाख #सोने #वीसलाख #फसवणूक #पंढरपूर #बसस्थानक #मंगळसूत्र #चोरी
Previous Post

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ- प्रसिद्ध डॉक्टरची झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या

Next Post

कुख्यात दहशतवादी यासिन मलिकला जन्मठेप; पाकला आला यासिनचा पुळका

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कुख्यात दहशतवादी यासिन मलिकला जन्मठेप; पाकला आला यासिनचा पुळका

कुख्यात दहशतवादी यासिन मलिकला जन्मठेप; पाकला आला यासिनचा पुळका

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697