नांदेड : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी आहे. नांदेडच्या प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. देवानंद जाजू यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, झोपेच्या गोळ्या सेवन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. दरम्यान, डॉ. जाजू हे 25 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत होते. त्यांचे रूग्णसेवा, सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. Excitement in Nanded medical field- Famous doctor commits suicide by taking sleeping pills
डॉ. देवानंद जाजू यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. देवानंद जाजू हे शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख होते. तसेच ते भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख होते. डॉ. जाजू यांनी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
पण त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नांदेडचे ग्रामीण पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. तपासाअंती सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. डॉ. जाजू हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून नांदेड शहराच्या सिडको भागात वैद्यकीय सेवा देत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547962913548109/
त्यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर आहेत. पण त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. तर डॉ. जाजू हे नांदेडमध्येच रुग्णसेवा करायचे. या दरम्यान आज दुपारी नांदेड ग्रामीण पोलिसांना डॉ. जाजू यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी डॉ. जाजू यांचं निधन झाल्याचं स्पष्ट झालं. डॉ. जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
डॉ. देवानंद जाजू हे मागील 20 ते 25 वर्षापासून नांदेड शहरातील सिडको भागात वैद्यकीय सेवा देत होते. त्यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर आहे. पण त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. तर डॉ. जाजू हे नांदेडमध्ये राहत होते. दरम्यान आज दुपारी नांदेड ग्रामीण पोलिसांना डॉ. जाजू यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी डॉ. जाजू यांचा मृत्यू झाला होता.
जाजू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर जाजू यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर येऊ शकते. डॉ. जाजू हे वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547876383556762/