चिखली – रस्त्याचे काम करीत असताना डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने एका मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि . २६) दुपारी ३:२५ वाजण्याच्या सुमारास माढा तालुक्यातील चांदज गावच्या हद्दीत घडली. Accidents in Madha and Mohol resulted in two deaths
रेखा जगन्नाथ शिंदे ( वय ५०, रा चिखली ता मोहोळ) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार – माढा तालुक्यातील चांदज माढा रोडवर सहकारी महिलांसोबत रस्त्याचे काम करीत असताना डंपर (क्रमांक एम एच ४२ एक्यू . ५८७९) वरील चालक भारत माणिक आसबे ( रा . बाभुळगाव ता . इंदापूर जि . पुणे ) याने त्याचे ताब्यातील डंपर हा हयगयीने व रोडची परस्थिती न पाहता पाठीमागे घेतले. यात डंपरला धडकल्याने रस्त्यावर पडून डोके डंपरचे पाठीमागील चाकास उटीसारखे लागून दबल्याने नाकातोंडातून रक्त येऊन गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला.
यात महिलेचा जागीच मृत्यू झाला . या प्रकरणी लक्ष्मण तानाजी शिंदे (रा . चिखली ता मोहोळ . हल्ली रा .आवे ता . पंढरपूर ) यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली. यावरून डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेचा अधिक तपास पोहेकाॅ तांबोळी हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/549375676740166/
□ यावली जवळ अपघात; एक ठार
मोहोळ : सोलापूर पुणे महामार्गावर यावली गावाजवळ टँकर व टेंपोच्या झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना गुरूवारी (ता. 26) सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेली माहितीनुसार सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर यावलीपाटीनजीक एम एच ४३ वाय ५१४७ हा टँकर रोडच्या मधोमध उभा होता. त्यास पाठीमागून आलेल्या टेंपो एम एच १३ आर ०४१४ याने जोराची धडक दिली. त्यात टेंपोचा चालक दयानंद जयपालराव इगवे ( वय ४७ रा. बसवकल्याण जि. बिदर कर्नाटक) हा गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला.
याबाबतची खबर यावलीचे सामाजिक कार्यकर्ते समाधान कारंडे यांनी मोहोळ पोलिसांना दिली. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस हे करत आहेत.
□ जेऊर येथे घरफोडी ३९ हजाराचे दागिने लंपास
https://www.facebook.com/109399567404448/posts/548737110137356/