गांधीनगर : गुजरातच्या मुंद्रा बंदरावर एका जहाजातून 52 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. याची बाजारात किंमत तब्बल 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. विशेष मीठ असल्याचे सांगत इराणमधून गुजरातमध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांच्या कोकेन ड्रग्जची आयात करण्यात आली. Gujarat imports Rs 500 crore worth of cocaine in the name of salt from Iran
हे ड्रग्ज इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले. या जहाजात 25 मेट्रिक टनाच्या 1 हजार मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. पण 24 ते 26 मे या कालावधीत डीआरआयला मालवाहू जहाजात 52 किलो कोकेन सापडले.
जहाजातील मिठाच्या बॅग तपासत असताना काही बॅगमध्ये एका वेगळ्या वासाचा पदार्थ असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर या पदार्थाची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. तपासणीत या पदार्थांमध्ये कोकेनची मात्रा असल्याचे समोर आले. यानंतर केलेल्या जप्तीच्या कारवाईत आतापर्यंत ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त झाले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/549246703419730/
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातल्या मुंद्रा बंदराजवळ एका कन्टेनरमधून 56 किलो Cocaine कोकेन महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात् डीआरआयने जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या मादकपदार्थाचे मूल्य जवळपास 500 कोटी रुपये आहे, अशी माहिती अधिकार्याने दिली.
नेमक्या किती प्रमाणातील कोकेन जप्त करण्यात आले, हे डीआरआयच्या अधिकार्याने जाहीर केले नाही. मात्र, ते 500 कोटी रुपयांचे असू शकते, कारण एक किलो कोकेन आंतरराष्ट्रीय बाजारात 10 कोटी रुपयांना मिळते. प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका कन्टेनरची तपासणी करण्यात आली. हे कन्टेनर काही काळापूर्वी मुंद्रा बंदरावर दाखल झाले होते.
या कटेनरमधील काही वस्तूंमध्ये कोकेन आणि अत्यंत व्यसनाधीन औषधे लपवून ठेवली होती, असे अधिकार्यांनी तपशील न देता सांगितले. कच्छ जिल्ह्यातील कांडला बंदराजवळच्या कटेनर स्टेशनवरून डीआरआयने 260 किलो हेरॉईन डीआरआयने जप्त केल्यानंतर काही महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनचे मूल्य 1300 कोटी रुपये होते.
● चालू वर्षात ३२१ किलो कोकेन जप्त
चालू वर्षात २०२१ – २२ मध्ये महसूल गुप्तचर विभागाने देशभरात कारवाई करत ३२१ किलो कोकेन जप्त केले होते. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३ हजार २०० कोटी रुपये होती. मागील एक महिन्यात डीआरआयने काही महत्त्वाचे गुन्हे दाखल केले आहेत.
यात कांडला बंदरावर जिप्सम पावडरची आयात करताना २०५ किलो हेरॉईन ड्रग्जची तस्करी, पिपावाव बंदरावर ३९५ किलो हेरॉईन, दिल्ली विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ६२ किलो हेरॉईन, लक्षद्वीप बेटाच्या किनाऱ्यावर २१८ किलो हेरॉईनचा समावेश आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/549186350092432/