कोल्हापूर : संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणूकातून माघार घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला असा आरोप केला होता. पण आता या विधानावर खुद्द राजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, लोकशाही आहे. उमेदवारी नाकारली यामध्ये घराण्याचा काही संबंध नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. कोणताही निर्णय घेण्याआधी त्यांनी माझ्याशी चर्चा विनिमय केला नाही. 2009 पासून त्यांनी आपले वाट वेगळे केलेले आहे. त्यामुळे यात घराण्याचा काही संबंध नाही, असे ते म्हणाले. Chhatrapati Shahu Raje Sambhaji Raje has nothing to do with rejection of candidature
संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे. संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे.
संभाजीराजे फडणवीस यांना भेटून आल्यानंतर लगेल घोषणा केली. हे लिंक केलं पाहिजे. आपण घोषणा केल्यानंतर सगळे आपल्याकडे धावून येतील पाठिंब्यासाठी हे कॅल्कूलेशन चुकलं आहे. राजकारणामध्ये असं एकदम होत नाही. विचार विनिमय अनेक प्रकारचे असतात, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. संभाजीराजे यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या हालचाली जानेवारी महिन्यापासून सुरू होत्या. त्याचवेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करायला अवधी होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/549927963351604/
त्यावेळी त्यांना कदाचित तुम्ही अपक्ष म्हणून उभारा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि महाविकास आघाडीचाही पाठिंबा घ्या, असा सल्ला मिळाला असेल. पण त्यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. फडणवीस यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेणे अपेक्षित होतं. पण त्यांनी तसे केले नाही, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
आमच्यात काही विचार विनमय झाला असता, किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. ते छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले. २००९ सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली आहे. भाजपने त्यांना दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील चर्चा झाली नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
संभाजीराजे यांना पाठिंबा पाहिजे होते तर इतर नेत्यांकडेसुद्धा जाणं गरजेचं होतं. तसा प्रयत्न केला पाहिजे होता. राज्यसभेसाठी गणित जुळवून आणता पक्ष घोषित करणं हा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मत जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झाले नाहीत. शेवटी लोकशाही आहे, त्यात काय चालते हे सगळ्यांना माहीत आहे. कुठं घोडं अडतंय हे त्यांना माहित असायला पाहिजे होतं, असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/549922160018851/