श्रीपूर : पुणे येथे सुरू असलेल्या वुमेन्स टी २० चॅलेंज स्पर्धेत काल गुरुवारी (२६ मे) वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर असा सामना खेळला गेला. ट्रेलब्लेझर संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात संघाच्या बॅटर्सने शानदार कामगिरी करत १९० धावा धावफलकावर लावल्या. Kiran Navgire of Solapur sets a record by scoring 50 off 25 balls in Women’s T20 Malshiras Sreepur
गोलंदाजांनी वेलोसिटी संघाला रोखण्यात यश मिळवणे. मात्र, तरीही सरस रनरेटने वेलोसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या सामन्यात माळशिरस तालुक्यातील श्रीपूरजवळील मिरे येथील किरण नवगिरे या युवा खेळाडूने सर्वांची मने जिंकली. आपला पहिलाच टी२० चॅलेंज सामना खेळणाऱ्या किरणने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.
कधीकाळी सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील श्रीपूरमधील चंद्रशेखर विद्यालयाच्या मैदानावर सराव करणारी किरण नवगिरे आज Womens T20 क्रिकेटमध्ये खेळत आहे, तिच्या या प्रवासामधील मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्वच प्रेरणादायी आहे.
ट्रेलब्लेझर संघाने वेलोसिटी संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी १५८ धावा करणे गरजेचे होते. वेलोसिटीला यस्तिक भाटिया व शेफाली वर्मा यांनी चांगली सुरुवात दिली. मात्र, खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पहिलाच सामना खेळणाऱ्या किरण नवगिरेने.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/549684960042571/
सोलापूरच्या असलेल्या किरणने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. तिने तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले. यादरम्यान अवघ्या २५ चेंडूंमध्ये तिने अर्धशतक साजरे केले. हे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी हा पराक्रम शेफाली वर्माच्या नावावर होता. तिने याचवर्ष सुपरनोवा विरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर, जेमिमा रोड्रिग्जने २०१९ मध्ये ३१ चेंडूत ही कामगिरी केली.
माळशिरस तालुक्यातील मिरे गावच्या किरण नवगिरे वुमेन्स टी२० चॅलेंज सामन्यांमध्ये सगळ्यात जलद धावा करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. तिने २५ बॉल मध्ये ५० धावा काढून आपल्या संघाला विजयाकडे खेचले. यापूर्वी किरणने अनेक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विक्रम केले आहेत. तिच्या चाहत्यांची आणि तिच्या गावच्या, शाळेतील अनेक क्रिकेट रसिकांनी तिला शुभेच्छा देऊन तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल केले आहेत. किरण नावगिरेचे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विश्वविक्रम केल्यानंतर तिचे अभिनंदन केले जात आहे. तर तिला भविष्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
□ किरणची झुंज
किरणने ३४ चेंडूवर ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. किरण बाद झाल्यानंतर संघातील कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकले नाही व संघाला १७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/549246703419730/