नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबद्दल एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दिल्लीमध्ये गेल्या चार महिन्यांत सुमारे 1900 मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी केवळ निम्म्याचाच शोध लागला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत शहरात 1879 मुले बेपत्ता झाल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. 1900 children go missing from Delhi in four months; How much was found?
अलिकडेच दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गत चार महिन्यांत शहरात 1879 मुले बेपत्ता झाली आहेत. हरवलेली बहुतेक मुले 12-18 वयोगटातील होती व या वयोगटातील बेपत्ता मुलांची एकूण संख्या सुमारे 1,583 होती. मात्र 1178 मुलांचा मागोवा घेण्यात दिल्सी पोलिसांना यश आले आहे.
12-18 वयोगटातील हरवलेल्या मुलांची संख्या गत वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी 2 टक्के वाढली आहे. त्याचवेळी 0-8 वयोगटातील 138 मुले बेपत्ता झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 टक्के घट झाली आहे. या वर्षी गेल्या चार महिन्यांत 8 ते 11 वयोगटातील 158 मुले बेपत्ता झाली आहेत. त्याचवेळी पोलिसांनी विविध वयोगटातील 980, 92 आणि 106 मुलांचा शोध घेतला. बेपत्ता व्यक्ती आणि फेशियल रेकग्निशन सिस्टम सॉफ्टवेअर जिपनेट बेपत्ता मुलांचा शोध घेण्यास मदत करते असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, 12-18 वयोगटातील हरवलेल्या मुलांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी 2% वाढली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये मुले आर्थिक दुर्बल कुटुंबातील होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, काहीवेळा कुटुंबांकडे मुलांची फोटोही नसतात, त्यामुळे आम्हाला इतर पुराव्याच्या मदतीने त्यांचा शोध घ्यावा लागतो. अहवालानुसार, 12-18 वर्षांची मुले बेपत्ता झाल्याबद्दल बोलत असताना बाल कल्याण समितीच्या एका सदस्याने खुलासा केला की, आमच्या समितीकडे नोंदवलेल्या अशा बहुतेक प्रकरणांमध्ये मुलींमुळे मुले घरातून पळून गेल्याचे आढळले.
एवढंच नाही तर पालकांची काळजी नसणं हे देखील एक कारण होतं. त्याच वेळी, पालक देखील त्यांच्या मुलांमधील वर्तन बदल किंवा बाहेरील लोकांचे त्यांच्या मुलांबद्दलचे वर्तन लक्षात घेण्यास अपयशी ठरले आहेत.
□ विशिष्ट ठिकाणांबद्दलचे आकर्षण
अलीकडील एका प्रकरणात, गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी युनिटने मुंबईतून अलीपूर येथील दोन बेपत्ता बहिणींचा ट्रॅक काढला, जिथे त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी गेल्या होत्या. दोघांनी इन्स्पेक्टर वीरेंद्र कुमार आणि त्यांची डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल सुकन्या यांना सांगितले की, ते मुंबईच्या जीवनशैलीकडे आकर्षित झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी घर सोडले आहे. विशिष्ट ठिकाणांबद्दलचं आकर्षण असणे हेसुद्धा घर सोडण्याचे प्रमुख कारण ठरत आहे.