सोलापूर : विविध कारणांसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेऊन रक्कम परतफेड न करता ९२ लाख ५८ हजार ९२१ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पिता – पुत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Father and son defraud bank of Rs 92 lakh in Solapur; Kalshi crime committed in father’s head for marriage
याप्रकरणी मंजुनाथ शिवाराम कलकुर (वय- ५०,रा. रुद्राक्ष आल्ले, नगर वसंत विहार,सोलापूर) या शाखा मॅनेजरने सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शावरप्पा यशवंत पाटील व दीपक शावरप्पा पाटील (रा.पाटील नगर,सैफुल विजापूर रोड,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,हाऊसिंग लोन, सीसी लोन,टर्म लोन यासाठी विविध रक्कमेनुसार बँकेतून लोन मंजूर करून घेऊन त्याची परतफेड न करता थकित व्याजासह ९२ लाख ५८ हजार ९१२ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शावरप्पा पाटील यांनी ३२२ स्वेअर मिटर ही जागा बँकेची परवानगी न घेता परस्पर आश्विनी शामराव भोसले दुय्यम निबंधक वर्ग २ उत्तर १ सोलापूर यांच्या कार्यालयात खरेदी दस्ताने विक्री केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553642259646841/
□ माझे लग्न का करत नाही म्हणून
मुलाने घातली बापाच्या डोक्यात कळशी
सोलापूर : माझे लग्न का करत नाही असे म्हणून चक्क बापाच्या डोक्यात मुलाने कळशी घालून जखमी केल्याची घटना गुरूवारी (दि.२ जून ) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इराबत्ती कॅन्टींगच्या पाठीमागे शास्त्रीनगर दक्षिण सदर बाजार सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी विजय लक्ष्मण गड्डम (वय-६५,रा. शास्त्रीनगर,दक्षिण सदर बाजार,सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, त्यांच्या फिर्यादीवरून मुलगा गोवर्धन विजय गड्डम (वय-३१,रा.शास्त्रीनगर,दक्षिण सदर बाजार सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी गड्डम यांच्या घरी लग्नकार्य असल्याने सर्वजण रात्री उशिरा झोपले होते. त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा दारू पिऊन घरी आला. तेव्हा फिर्यादी विजय यांनी तू इतक्या रात्री कुठे होतास असे विचारले. दरम्यान फिर्यादीला मुलाने शिवीगाळ करून तू मला विचारणारा कोण असे म्हणाला. त्यानंतर माझे लग्न का करत नाही,थांब आता तुला सोडतच नाही,असे म्हणून घरातील स्टीलच्या कळशीने मुलाने वडिलांच्या डोक्यात मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक सरतापे हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553596349651432/