□ टाकळी सिकंदर येथे घडला प्रकार
मोहोळ : डॉक्टरने तपासले नसल्याचा राग मनात धरून हॉस्पिटलमधील डॉक्टरसह कर्मचाऱ्यास मारहाण करून केबिनची नुकसान करून दहा हजार रुपये लुटल्याची घटना टाकळी सिकंदर येथे घडली. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर संतोष बाबर यांचे टाकळी सिकंदर येथे अनया हॉस्पिटल आहे. डॉक्टर पती-पत्नी दोघेही या यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतात रात्री नऊ वाजता हॉस्पिटल बंद करून खाजगी कामासाठी ते पंढरपूर येथे गेले होते. त्यांना अतुल बनसोडे यांनी फोन करून सांगितले की मी हॉस्पिटल मध्ये मुलाला घेऊन आलो आहे त्याची तब्येत ठीक नाही तुम्ही त्याच तपासा. यावर डॉक्टरांनी त्यास मी बाहेर आलो आहे शेजारच्या डॉक्टरकडे जाण्यास सांगितले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553330726344661/
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले असता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे मदतनीस शरण गावडे व अरविंद वाघमारे यांनी सांगितले की तुला बनसोडे आठ ते दहा जणांना घेऊन हॉस्पिटल मध्ये आले आले होते. त्यांनी मदतनीस यांना कानाखाली वाजवली व ओपीडी केबिनचे आत मध्ये प्रवेश करून आतील ड्रावर मधून अंदाजे आठ ते दहा हजार रुपये घेऊन गेले असल्याचे निदर्शनास आले.
□ डॉक्टराच्या पत्नीस शिवीगाळ, लिहिल्या गाडीवर अश्लील मजकूर
डॉक्टराच्या पत्नीसही शिवीगाळ करून त्यांच्या गाडीवर अश्लील शिव्या लिहून गेले असल्याचे त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले. याबाबत डॉक्टरांनी अतुल बनसोडे यास फोन लावला असता त्याने तो फोन उचलला नाही. काही वेळाने मदतनीस शरण गावडे यांच्या मोबाईलवर अतुल बनसोडे फोन करून डॉक्टरांना फोन द्या, असे सांगितले.
घडल्या प्रकाराबाबत यास विचारले असता तो डॉक्टरांना उलट सुलट बोलू लागला. नंतर काही वेळाने अतुल बनसोडे हा इतर ते २५ जणांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येवून डॉक्टर व मदतनीस यांना शिवीगाळ मारहाण केली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी मध्यस्ती केली. अतुल बनसोडे, दिपक वाघमारे, विश्वास वसेकर, संजय सोनटक्के, गणेश शेटे, अमोल गवळी, कसबे कदम व इतर वीस जण यांच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553310906346643/