अमरावती : आमदारास 3 महिने कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यावर पाण्याची बॉटल आणि शाईफेक प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. अमरावतीच्या मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. Devendra Bhuyar Amravati MLA sentenced to 3 months imprisonment in Shaifek case
देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषद सदस्य असताना दिनांक 28 मे 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या बैठकीत हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडून आले होते मात्र त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील बेनोडा गावाच्या पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक आणि पाणी बॉटल फेकून मारली होती.
या प्रकरणात आज न्यायालयात न्यायाधीशांनी आमदार देवेंद्र भुयार यांना कलम 353 भा दं.वि. अन्वये 3 महिने कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. जर आमदार देवेंद्र भुयार यांनी 15 हजार दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 साली ही घटना घडली होती. आज जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/555947399416327/
बेनोडा गावाचा पाणीपुरवठयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला अटक करण्यात आली, त्यावेळी मला 8 दिवसाची सजा झाली. त्यानंतर बेनोडा गावाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली ती योजना आज कार्यान्वित सुद्धा झाली आहे. या प्रकरणामध्ये मला जी काही शिक्षा मिळाली ती मला मान्य आहे. या विरोधात मी न्यालायमध्ये दाद मागणार असल्याचे म्हटले. जनतेची अधिकाऱ्यांनी आपल्या पगारात प्रामाणिकपणे कामे करावी असं आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.
बेनोडा गावाचा पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना त्या प्रश्नावर आमदार देवेंद्र भुयार सातत्याने प्रश्न मांडत होते. मात्र, त्यावर जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नव्हते अनेक वेळा मागणी करून सुद्धा त्यावर मार्ग निघत नव्हता. आमदार देवेंद्र भुयार सभागृहामध्ये सातत्याने त्यांच्या अधिकाराचा उपयोग करून सभागृहात प्रश्न मांडत असतांना तो प्रश्न अधिकाऱ्यांच्या पचणी पडला नसल्याने त्यांना अडचणीत आणले.
पुढे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांना 8 दिवसाची शिक्षा झाली होती. 2019 साली जिल्हा परिषदेत पाणी टंचाई विषयावर विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासभेला तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, आमदार देवेंद्र भुयार आदी उपस्थित होते. या सभेत गटविकास अधिकारी सुभाष बोपटे पाणी टंचाईवर माहिती देत असताना त्यांच्यावर आमदार देवेंद्र भुयार यांनी माईक आणि पाणी बॉटेल्स फेकून मारल्या.
त्यामुळे सभेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. सभेत पाणी बॉटल्स मारल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याने तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/555904032753997/