मुंबई : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी वाट पाहत आहेत. अशातच आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण बारावीचा निकाल उद्या बुधवारी लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. Big Breaking – Twelfth result tomorrow
बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या बारावीचा निकाल लागणार आहे. कोरोना आटोक्यात आल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या निकालाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
उद्या दुपारी एक वाजता www. mahahsscboard.in या बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या परीक्षेचा सीट नंबर आणि आईचं नाव माहिती असणे आवश्यक आहे.
८ जून, २०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.
उद्या बारावीचा निकाल, येथे पाहू शकता उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वी परीक्षेचा निकाल लागणार आहे. विद्यार्थी आणि पालक याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
– mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या..
– होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
• तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
– “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / बारावीचा निकाल 2022 स्क्रीनवर
दिसेल.
https://hscresult.11thadmission.org.in
maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जावून निकाल पाहू शकता.
होमपेजवर, MSBSHSE १२ वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556356279375439/