मुंबई : राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना आमदारकी मिळणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त यादीमध्ये दिले होते. परंतु, ती यादी अद्यापही प्रलंबित असल्याने खडसेंना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही. यामुळे एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. Opportunity for Eknath Khadse from NCP for Legislative Council Political Exile
भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी पार पडणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जूनपर्यंत आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. तर, विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. याआधी 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे.
राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक आणि विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे.
याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/556345076043226/
सूत्रांच्या माहितीनुसार, यात एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे आलं असून लवकरच नाथाभाऊंच्या नावाची घोषणा केली जाईल. एकनाथ खडसे यांच्यासह रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे यांचे नाव राज्यपाल नियुक्त यादीमध्ये दिले होते. परंतु, ती यादी अद्यापही प्रलंबित असल्याने खडसेंना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही. यामुळे एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना बेरजेचं राजकारण चांगलं जमतं, असं म्हटलं जातं. दोन वर्षांपूर्वी खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला गळाला लावत भाजपला मोठा दणका दिला होता. पण त्यानंतरही भाजपला पूर्णपणे शह देण्यात पवारांना यश आलं नव्हतं. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर, आजारपण आणि ईडीची चौकशी या दोन कारणांमुळे पक्षात फारसे सक्रिय होऊ शकले नव्हते. खडसे ईडीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे त्यांच्या बाजूने उभी राहू शकली नव्हती.
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ते विधानपरिषदमार्गे आमदार होतील. पुढे मंत्रीपद मिळवतील, असा आडाखा बांधला जात होता. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांमध्ये एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश करून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले होते. पण भाजपच्या खेळीमुळे ते शक्य झालं नव्हतं. भाजपमुळेच खडसेंची आमदारकी लांबणीवर पडली होती. आता रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या जागांमध्ये खडसेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556494316028302/