Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

कन्नड भवनाच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो : पालकमंत्री

Make good administrative officers through Solapur Kannada Bhavan: Guardian Minister

Surajya Digital by Surajya Digital
June 7, 2022
in Hot News, सोलापूर
0
कन्नड भवनाच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो : पालकमंत्री
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचे भूमिपूजन संपन्न

सोलापूर : वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचा वापर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी येणाऱ्या जगतगुरू महाराजांच्या निवासासाठी होणार आहे. या भवनातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना चांगली अभ्यासिका करावी. या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. Make good administrative officers through Solapur Kannada Bhavan: Guardian Minister

कुंभार वेस येथील जयभवानी मैदानात वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य, जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, धर्मराज काडादी, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल आदींसह लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, कन्नड भवनाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व्हावेत. भवनाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. जिल्हा नियोजन समितीतून एक कोटींचा निधी दिला जाईल. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर निधीची कमतरता नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

गेल्या दोन वर्षात कोरोना संकट होते, याचा मुकाबला आपण केला. कोरोना काळात खाजगी दवाखान्यांनी ओपीडी बंद केली होती, डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना ओपीडी सुरू करण्यास सांगितले. कोरोना काळात सुरूवातीला भीती होती, कोणी कोरोना रूग्णाजवळ जात नव्हते. मात्र पालकमंत्री सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात जावून रूग्णांची विचारपूस केली. स्वच्छता, अन्न, पाणी यांची योग्य सोय असल्याची खात्री केली असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

□ दीड वर्षांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार

 

सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी चार-चार दिवस वाट पाहावी लागत आहे, हे दुर्देव आहे. येत्या दीड वर्षात समांतर पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे सोलापूरकरांना रोज पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

□ महात्मा बसवेश्वर महाराजांचेही स्मारक

 

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक नियोजित आहे. यासाठी 45 एकर जागा मंजूर झाली असून महात्मा बसवेश्वर महाराजांचे चांगल्या प्रकारचे स्मारक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महेश कोठे यांनी सांगितले की, कन्नड भवनाचा वापर लिंगायत समाजातील मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी केला जाईल. मुलांच्या राहण्याची, अभ्यासाची सोय येथे होणार आहे. बहुउद्देशीय सभागृह म्हणून कन्नड भवनचा उपयोग होणार असल्याचे म्हटले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

 

Tags: #good #administrative #officers #Solapur #Kannada #Bhavan #GuardianMinister#कन्नड #भवन #सोलापूर #चांगले #प्रशासकीय #अधिकारी #पालकमंत्री #दत्तात्रयभरणे
Previous Post

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी ?

Next Post

Ketki Chitale सत्तेचा गैरवापर करुन मला अटक केली, केतकीची हायकोर्टात धाव

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Ketki Chitale  सत्तेचा गैरवापर करुन मला अटक केली, केतकीची हायकोर्टात धाव

Ketki Chitale सत्तेचा गैरवापर करुन मला अटक केली, केतकीची हायकोर्टात धाव

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697