मुंबई : भाजपने विधानपरिषदेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा झटका समजला जात आहे. आपल्याला संधी मिळाली तर त्याचे सोने करू असे पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेच्या उमेदवारी संदर्भात भाष्य केलं होतं. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत होते. पण शेवटी त्यांना पुन्हा एकदा हुलकावणी देण्यात आली. Legislative Council Candidacy – Pankaja Munde’s address cut again Chitra Wagh Khot Lad Darekar Khapre
विधानपरिषदेसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकही जाहीर झाली आहे. मात्र या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे.
भाजपसोबत असलेल्या लहान घटक पक्षांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली.
पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपनं पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांना पुन्हा संधी देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एवं बिहार राज्यों में होने वाले आगामी विधान परिषद द्विवार्षिक चुनाव- 2022 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की। pic.twitter.com/cOzfHhaDQY
— BJP (@BJP4India) June 8, 2022
राज्यात राज्यसभा निवडणूकीमुळे वातावरण तापले आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभुमीवर भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे पाचही उमेदवार आजच अर्ज दाखल करणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, असेही पाटील यांनी सांगितले. विधान परिषदेसाठी आम्ही पाचवी जागा जिंकून आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/556967569314310/