सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीवर राजेंद्र माने यांची नियुक्ती झाली आहे. तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. हरिष बैजल नुकतेच सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांच्याकडे पदभार दिला आहे. नूतन पोलीस आयुक्त लवकरच पदभार घेतील. Rajendra Mane will soon take over as the new Commissioner of Police of Solapur
नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्य काळात एक वर्ष आणि हिम्मतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात दोन वर्ष असे तीन वर्ष पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.
तत्कालीन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये रूजू झाले. अवघ्या सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त हरिष बैजल हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. आयपीएस अधिकारी हिरेमठ यांची पोलीस आयुक्तपदावर अतिरिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शासनाने सध्या सर्व बदल्या थांबविल्या आहेत. ३० जूनपर्यंत बदल्या होणार नाहीत असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापुरात रिक्त होणाऱ्या पोलीस आयुक्तपदाबाबत प्रश्न निर्माण झाला होता. शासनाकडून नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत सुधीर हिरेमठ यांच्याकडे अतिरिक्त पदभार राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आज नवीन पोलीस आयुक्तांचा आदेश काढण्यात आला आहे.
राज्यातील 5 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस उपायुक्त (DCP), पोलीस अधीक्षक (SP) दर्जांच्या पोलीस अधिकारी यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
राजेंद्र माने (पोलीस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई (पदोन्नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन) ते पोलीस आयुक्त सोलापूर शहर राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी आज बुधवारी (दि. 8) याबाबचे आदेश काढले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557166589294408/
□ सोलापूर : बारावीचा निकाल ९४.२२ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. 94.15 percent result of 12th standard in Solapur
सोलापूरातून ३१ हजार ७४५ मुलांनी परिक्षा दिली. यातील २९ हजार ४४५ मुलं पास झाली, तर २२ हजार ७३४ मुलींनी परिक्षा दिली, त्यातील २१ हजार ८५० मुली पास झाल्या. एकूण ५४ हजार ४७९ विद्याथ्यांपैकी ५१ हजार २९५ विद्यार्थी पास झाले आहेत विज्ञान विभागाचा निकाल ९८.८३, कला ९०.५७, वाणिज्य ९२.५५ टेक्निकल ८३.३०, तर व्हिओसी ८८.४३ टक्के निकाल लागला आहे.
– सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.१५
– सायन्स शाखेचा ९८.८३ टक्के, कॉमर्स शाखेचा ९२.५५ तर आर्ट शाखेचा ९०.५७, व्होकेशनल ८८.४३
– राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्यातील ५४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ५१ हजार २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१५ टक्के इतका आहे.
– मुलीं ९६.११ टक्के तर मुले ९२.७५ टक्के उत्तीर्ण झाले. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/557045175973216/