सांगली : सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना एका अज्ञात व्यक्तीने जखमी केले आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेले असता हा चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शहरातील नागरिक प्रश्न विचारात आहेत कि अधिकारीच सुरक्षित नसतील तर आम्ही कुणाकडे बघायचे? Shocking type in Maharashtra, female deputy collector attacked with a knife Sangli Vishrambag police
उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर हल्ला झाला. मात्र मार्शल आर्ट असलेल्या हर्षलता गेडाम यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावर धूम ठोकली. याप्रकरणी हेमलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हर्षलता गेडाम या नियमित जॉगिंगला जातात. हल्लेखोरांनी त्यांना जॉगिंग करत असतानाच गाठलं. मोटारसायकवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गेडाम यांच्यावर हाताला पकडलं. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघांनी आधी त्यांच्या दंडाला हात लावून ओढत “चलते का” ? म्हटल्याचे सांगितलं जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/558575722486828/
हाताला पकडताच गेडाम यांनी लाथ मारून हल्लेखोरांना खाली पाडले. या झटापटीवेळी दुसऱ्या आरोपीने गेडाम यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गेडाम या किरकोळ जखमी झाल्या आहेत. गेडाम यांनी जोरदार प्रतिहल्ला केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
अधिक माहितीनुसार, या दोन हल्लेखोरांनी याआधीही १७ मे रोजी गेडाम यांचा पाठलाग केला होता. तसेच, त्यांची छेडछाडही केली होती. त्याच व्यक्तींनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
□ ऊसतोड कामगाराच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
#बीड #BEED #girls #death #surajyadigital #सर्पदंश #snake #bites #सुराज्यडिजिटल
□ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सातेफळ गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. पायल रामेश्वर साळुंके असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती कळंब येथील महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील पेशाने ऊसतोड कामगार होते.
पायल काल गुरूवारी दुपारी आपल्या घरी झोपलेली असताना सायंकाळी ४ च्या दरम्यान घरात शिरलेल्या विषारी सापाने तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेच्या शिराजवळ चावा घेतला. सापाने चावा घेतल्यानंतर पायलला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.